Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईपालघरबलात्कार प्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

बलात्कार प्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

Subscribe

आरोपींनी त्या महिलेला ठाणे येथे घेऊन न-जाता तिला फाउंटन टोलनाका येथून परत दोन वेळा गाडी नेत गाडी फाउंटन नाक्यावरून विरारच्या दिशेने नायगाव परिसरात नेत रस्त्याच्या बाजूला बलात्कार केला होता.तसेच तिच्याकडील ऐवजही चोरला होता.

भाईंदर : काशीमिरा येथून २०१९ साली एक महिला ठाणे येथे जाण्यासाठी लिफ्ट मागून गाडी थांबवून जात असताना त्या गाडीतील ड्रायव्हर आणि त्याचा साथीदार याने या महिलेवर बलात्कार केला होता. याप्रकरणी काशीमिरा पोलीस ठाण्यात बलात्कार, जबरी चोरी आणि अपहरणाचा गुन्हा करण्यात होता. त्यात पोलिसांनी कुठलाच सुगावा आणि पुरावा नसतानाही त्यात उत्कृष्ट तपास करून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि ५५ हजार दंड ठोठावला आहे.सुरेश पांडुरंग गोसावी (वय ३२ वर्ष) आणि उमेश उर्फ राकेश झाला (वय ३१ वर्ष, दोघेही रा. दहिसर पूर्व),अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी त्या महिलेला ठाणे येथे घेऊन न-जाता तिला फाउंटन टोलनाका येथून परत दोन वेळा गाडी नेत गाडी फाउंटन नाक्यावरून विरारच्या दिशेने नायगाव परिसरात नेत रस्त्याच्या बाजूला बलात्कार केला होता.तसेच तिच्याकडील ऐवजही चोरला होता.

त्यानंतर ते पुन्हा वज्रेश्वरी येथे एक लॉज रूम घेण्यासाठी गेले असता त्याठिकाणी पीडितेने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या लोकांनी तिची सुटका केली होती. यानंतर पोलिसांनी तपास करत या गुन्ह्याचा छडा लावला. दोन्हीही आरोपींना अपहरणाच्या गुन्ह्यात १४ वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार दंड, बलात्कारप्रकरणी आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला ऐतिहासिक निकाल ठाणे न्यायालयाने दिला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे आणि पोलीस हवालदार अजय मांडोळे यांनी केला आहे. सदरील शिक्षा ही ठाणे सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश वसुधा भोसले यांनी सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून राजेंद्र पाटील आणि वर्षा चंदने यांनी कामकाज पाहिले आहे. तसेच काशीमीराचे कोर्ट अंमलदार साईदास चव्हाण, अनिल मढवी यांनी कामकाज पाहिले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे.


Edited By Roshan Chinchwalkar