Homeमहामुंबईपालघरमिरारोड रेल्वे स्थानक परिसरातील १५ स्टॉल्सवर कारवाई

मिरारोड रेल्वे स्थानक परिसरातील १५ स्टॉल्सवर कारवाई

Subscribe

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्टेशन परिसरात १५० मिटर पर्यंत कुठल्याच फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेने ३१ जानेवारी रोजी रोजी प्रभाग समिती क्र. ५ च्या कार्य क्षेत्रातील मिरारोड स्टेशन परिसरात ही तोडक कारवाई केली आहे.

भाईंदर : मिरारोड रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा स्टॉल्सचे प्रमाण वाढले होते. त्यात नागरिकांना चालणेही मुश्कील झाले होते.तसेच बेकायदा धंद्यांना उत आला होता. याआधी फेरीवाल्यांच्या गाड्या आणि स्टॉल लावण्यावरून गोळीबार करून खून करण्यात आला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने त्याठिकाणी कारवाई करत अगोदर फेरीवाले हटविले आणि त्यानंतर बेकायदा स्टॉल्स आणि शेडबांधणार्‍यांना पालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटविले आहे. त्यात १५ स्टॉल्स आणि बांबू ताडपत्रीचे शेड यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय नोंदणीकृत वृत्तपत्र विक्रेत्यांवरही पालिकेनी कारवाई केली आहे. त्यावरून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्टेशन परिसरात १५० मिटर पर्यंत कुठल्याच फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेने ३१ जानेवारी रोजी रोजी प्रभाग समिती क्र. ५ च्या कार्य क्षेत्रातील मिरारोड स्टेशन परिसरात ही तोडक कारवाई केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मिळकत विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग समिती क्र. ५ च्या सहाय्यक आयुक्त प्रियांका भोसले, नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे आणि त्यांचा स्टाफ, अतिक्रमण पोलीस कर्मचारी, कनिष्ठ अभियंता दर्शन पाटील, लिपिक योगेश घरत, दिनेश चापके, फेरीवाला पथक प्रमुख मुरली पाटील, राकेश त्रिभुवन, सचिन साळुंके आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्ताच्या सहाय्याने ही तोडक कारवाई करण्यात आली. तसेच यानंतर भाईंदर रेल्वे स्थानक (पूर्व) आणि पश्चिम येथे फेरीवाला मुक्त कारवाई होणार असल्याचे पालिका आयुक्त संजय काटकर यांनी सांगितले आहे.


Edited By Roshan Chinchwalkar