Homeमहामुंबईपालघरव्यापार्‍याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक

व्यापार्‍याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक

Subscribe

तसेच व्यापार्‍यांनी जर कामगारांना महाराष्ट्र कामगार सेनेचे सभासद करुन न दिल्यास खंडणी स्वरुपात रोख रक्कम प्रति महिना २० हजार द्यावी लागेल.

भाईंदर : मिरा- भाईंदरमधील मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकार्‍याला खंडणीसाठी व्यापार्‍याला धमकावणे चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मनसे पदाधिकार्‍याला अटक केली आहे.
भाईंदर पूर्वेला नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत औद्योगिक परिसरात व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांना महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी चंद्रशेखर रविंद्र जाधव आणि त्यांच्या सहकार्‍यांनी भेटून व्यापार्‍यांना त्यांच्याकडे असलेल्या कामगारांना महाराष्ट्र कामगार सेनेचे सभासद म्हणून जबरदस्तीने सहभाग होण्याची धमकी दिली होती,अशी तक्रार होती.

तसेच व्यापार्‍यांनी जर कामगारांना महाराष्ट्र कामगार सेनेचे सभासद करुन न दिल्यास खंडणी स्वरुपात रोख रक्कम प्रति महिना २० हजार द्यावी लागेल. असे न केल्यास सर्व औद्योगीक कारखाने बंद करुन टाकेन, अशी धमकी एप्रिल २०२४ ते २५ जानेवारी या कालावधीत दिली होती.तशी तक्रार व्यावसायिक दिपक अग्रवाल यांनी दिली होती.तक्रारीवरून नवघर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच गुन्हयातील याप्रकरणी आरोपी चंद्रशेखर रविंद्र जाधव यांना नवघर पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. तर त्यांचे तीन साथीदार अजूनही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवास गारळे हे तपास करीत आहे.

 

सदर पदाधिकार्‍यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येईल.तसेच अशा प्रकारच्या गैरकृत्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी न घालता पक्षाकडून कारवाई करण्यात येईल.

– संदीप राणे,शहराध्यक्ष ,मनसे मिरा-भाईंदर


Edited By Roshan Chinchwalkar