HomeमहामुंबईपालघरAshok Dhodi: फरार आरोपींनी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी पोलिसांच्या ताब्यात

Ashok Dhodi: फरार आरोपींनी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

अखेर, राजस्थानमधील पाली येथे संशयित वाहन असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालघर पोलिसांचे पथक तातडीने तेथे रवाना झाले आणि ही कार ताब्यात घेण्यात यश आले.

पालघर : शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण व हत्येप्रकरणी महत्त्वपूर्ण प्रगती झाली असून, फरार आरोपींनी राजस्थानकडे पळून जाण्यासाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी पालघर पोलिसांनी जप्त केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास राजस्थानमधील पाली येथून पालघर पोलिसांनी ही कार जप्त केली. अशोक धोडी यांच्या हत्येनंतर आरोपी तात्काळ पसार झाले होते. तपासादरम्यान, आरोपींनी पळण्यासाठी स्कॉर्पिओ गाडीचा वापर केल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू केली होती. अखेर, राजस्थानमधील पाली येथे संशयित वाहन असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालघर पोलिसांचे पथक तातडीने तेथे रवाना झाले आणि ही कार ताब्यात घेण्यात यश आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून वेगवान तपास सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांनी या गाडीच्या माध्यमातून आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लवकरच या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालघर जिल्ह्यात या घटनेमुळे मोठी खळबळ माजली असून, पोलिसांकडून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.


Edited By Roshan Chinchwalkar