विरार : पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी जव्हार येथील राजीव गांधी स्टेडियम येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. पालघर जिल्ह्यात आदिवासी विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात. परंतु या योजना आदिवासी समाजातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संवाद व प्रचार करुन आदिवासी विभागांतर्गत योजनांचे सादरीकरण करुन सकारात्मक विचार घेऊन यापुढे आदिवासी विभाग धावत राहील. तर कधीही थांबणार नाही. तसेच आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी जव्हार येथे आदिवासी मेळाव्यात केले.
आदिवासी विभागामार्फत आश्रम शाळा व अनुदानित आश्रम शाळा, तसेच आदिवासी विभागामार्फत नवीन वसतिगृह बांधण्यात येणार आहे. आदिवासी मुली व मुले आदिवासी विभागाकडून राबविण्यात येणार्या योजनांमधून पायलट आणि हवाई सुंदरी होतील अशी मला खात्री आहे. यासाठी आदिवासी विकास महामंडळाकडून योजना राबविण्याचा संकल्प केला आहे. तो सार्थक होईल आणि कातकरी समाजासाठी आदिवासी विभागाकडून ज्या ज्या योजना आहेत त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी ,असे निर्देश मंत्री डॉ. अशोक उईके यांनी संबंधित अधिकारी वर्गाला यावेळी दिले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, डहाणू नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भरतकुमार राजपूत, आदिवासी आयुक्त दिपक कुमार मीना, प्रकल्प अधिकारी करिश्मा नायर, सत्यम गांधी, जिल्हा परिषद सभापती संदीप पावरे, उपायुक्त दीप पोळ उपस्थित होते.