विरार: ‘प्रजासत्ताक दिनाचे’ औचित्य साधून २६ जानेवारी, २०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६ ठिकाणी महानगरपालकेमार्फत आयुष्यमान आरोग्य मंदीर नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सुरु करण्यात आले. प्रभाग समिती ‘सी’ कार्यालय, पहिला मजला, विरार पूर्व येथील आयुष्यमान आरोग्य मंदीराचे उद्घाटन आमदार राजन नाईक आणि प्रथम महिला महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच इतर आयुष्यमान आरोग्य मंदिरांचे उद्घाटन तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मान्यवर नागरिक, महानगरपालिका अधिकारी, वैद्यकीय आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
आयुष्यमान आरोग्य मंदीरांची यादी खालीलप्रमाणे :
१) आयुष्यमान आरोग्य मंदीर, दहिसर, ग्रामपंचायत कार्यालय जागेत, विरार पूर्व
२) आयुष्यमान आरोग्य मंदीर, कणेर समाजमंदिर, पहिला मजला, विरार पूर्व
३) आयुष्यमान आरोग्य मंदीर, दोस्ती कॉम्प्लेक्स, वसई पश्चिम
४) आयुष्यमान आरोग्य मंदीर, फादरवाडी, वसई पूर्व
५) आयुष्यमान आरोग्य मंदीर, प्रभाग समिती ‘सी’ कार्यालय, पहिला मजला, विरार पूर्व
६) आयुष्यमान आरोग्य मंदीर, दिवलाई पाडा, विरार पूर्व