Homeमहामुंबईपालघरअमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणार्‍या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणार्‍या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

Subscribe

याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी पाच मोबाईल फोन आणि चार लॅपटॉप जप्त केले आहेत, अधिक तपास मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.

भाईंदर : भारतात बसून अमेरिकेतील नागरिकांना ऑनलाईन सायबर फसवणूक करून गंडा घालणार्‍या काशीमिरा हटकेशमधील एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश पोलीस आयुक्तालयाचे मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने केला आहे.याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी पाच मोबाईल फोन आणि चार लॅपटॉप जप्त केले आहेत, अधिक तपास मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत. मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरग यांंनी सांगितले की, सदरील बोगस कॉल सेंटरच्या मुख्य सूत्रधाराला गुन्ह्यात ताब्यात घेत अटक केली आहे. यातील लोकांनी काही बोगस नंबर ऑनलाईन गुगल साईटवर कस्टमर केअर नंबर अपलोड केले होते.

ते बोगस नंबर गुगलवर अमेरिकन नागरिकांना पार्सल वेळेवर न-येणे किंवा कोणती समस्या असल्यास किंवा चुकून दुसर्‍याचे पार्सल पोहोचल्यास गुगलवर कस्टमर केअर नंबर दाखवून त्यातून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काही डॉलर चार्ज देण्याचे बोलत होते. त्यातून आर्थिक फायदा करत सायबर फसवणूक करत होते. अमेरिकेन नागरिकांचा कॉल आला त्याच दरम्यान त्यांच्याकडून ओटीपी द्वारे बँक खात्याची माहिती मिळवून त्यांच्याकडून त्यासाठी ओटीपी घेत होते. तसेच ग्राहकांना गिफ्ट व्हावचर घेण्याच्या नावाखाली सहा अंकी पिन नंबर देण्यास सांगत होते व त्यामाध्यमातून ऑनलाईन फसवणूक करत होते. याप्रकरणी पोलिसांनी धाडीत शाहरुख अब्दुल शेख (वय ३० वर्ष), इम्रान खान (वय २७ वर्ष), इर्शाद शेख (वय ३७ वर्ष), पुनीत चौहान (वय ३३ वर्ष), तानीया पाठक उर्फ सोफिया (वय २२ वर्षे), ऐश्वर्या पेडणेकर (वय २३ वर्ष) आणि कॅरीटा मथायास (वय २९ वर्ष )यांच्यावर कारवाई केली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ, मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय सरग हे करत आहेत.


Edited By Roshan Chinchwalkar