Homeमहामुंबईपालघरदिवस पहिला : ४१ इमारतींवरील तोडक कारवाई सुरू

दिवस पहिला : ४१ इमारतींवरील तोडक कारवाई सुरू

Subscribe

या इमारतींवर ३१ जानेवारी तोडक कारवाई करून उच्च न्यायालयाला त्याचा अहवाल पालिकेने सादर करावे लागणार आहेत असे देखील सांगण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने पालिकेच्या वतीने गुरुवार २३ जानेवारीपासून कारवाईला सुरुवात झाली आहे.

विरार : नालासोपारा पूर्वेकडील विजय लक्ष्मी परिसरातील ४१ इमारतींवर गुरुवार २३ जानेवारी रोजी सकाळपासूनच कारवाईला सुरुवात झाली होती. दिवसभरातून एकच इमारत तोडण्यात पालिकेला यश आले असून उर्वरित इमारती या २४ जानेवारी रोजी सकाळपासूनच पोलिसांच्या बंदोबस्तात तोडल्या जातील, असे पालिकेच्या प्रभाग समिती डी चे सहायक आयुक्त मोहन संखे यांनी बोलताना सांगितले.वसई- विरार शहर महानगरपालिकेच्या नालासोपारा पूर्वेकडील राखीव जागेवर झालेल्या अनधिकृत ४१ इमारती बाबत उच्च न्यायालयाने इमारती जमीनदोस्त करण्याचा निकाल दिला आहे. या इमारतींवर ३१ जानेवारी तोडक कारवाई करून उच्च न्यायालयाला त्याचा अहवाल पालिकेने सादर करावे लागणार आहेत असे देखील सांगण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने पालिकेच्या वतीने गुरुवार २३ जानेवारीपासून कारवाईला सुरुवात झाली आहे.

पालिका प्रशासनाने आम्हाला घराच्या बदली घर द्यावे, या अधिक आम्हाला पालिकेकडून कोणतीच अपेक्षा नाही. पालिकेने केलेल्या कारवाईमुळे आम्ही बेघर झालो आहोत. रस्त्यावर राहण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे. दिवस- रात्र काम करून या ठिकाणी पैसे भरले होते. आता पैसेही गेले आणि घरही गेले जीव-देण्या पलीकडे आमच्याकडे काहीच उरलेले नाही, अशी प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. वसई- विरार शहर महानगरपालिकेचे प्रभाग समिती डी चे सहाय्यक आयुक्त मोहन संखे यांच्या उपस्थितीत ही कारवाई होत आहे. प्रशासनाने बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी ४०० पेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच पालिकेचे कर्मचारी आणि एमएसएफ जवान देखील उपस्थित होते.

शाळकरी परीक्षार्थी मुलांची नाराजी

पालिकेच्या वतीने कारवाई केल्या जाणार्‍या ठिकाणी देखील शाळकरी मुले राहतात. नुकत्याच शाळकरी मुलांच्या वार्षिक परीक्षा चालू झाल्या आहेत. या कारवाईमुळे त्या मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होऊ शकतो. यातच दहावीत शिकणार्‍या गरिमा गुप्ता हिच्या आक्रोशाने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.गरिमा शिवसहाय गुप्ता, ही वसईतील जी जी जे वर्तक विद्यालयात दहावीची विद्यार्थिनी आहे. कारवाईमुळे तिच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला आहे. तिची बोर्डाची वार्षिक परीक्षा असून, मी कशी परीक्षा देऊ असा सवाल गरिमा ने उपस्थित केला आहे. तर स्थानिक आमदार राजन नाईक, स्नेहा दुबे यांनी निवडणुकी वेळेस खोटी आश्वासने देऊन आमची फसवणूक केली आहे, असा आरोप देखील तिने केला आहे.


Edited By Roshan Chinchwalkar