विरार : नालासोपारा पूर्वेकडील आत्मवल्भ इमारतीच्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. याच खड्ड्यात
पडून एका ६० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अब्दुल गनी असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. तुळींज पोलिसांनी अग्निशन जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मुंबईच्या मालाड याठिकाणी राहणारे अब्दुल गनी हे आपल्या भावाकडे नालासोपाराच्या साईनाथ नगर येथे राहण्यासाठी आले होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता घरातून फेरफटका मारण्यासाठी बाहेर निघाले होते. मात्र दिवसभर घरी आले नसल्यामुळे त्यांच्या घरातील नागरिकांनी शोधण्यास सुरुवात केली होती. मात्र ते सापडले नाहीत. त्यानंतर बुधवारी सकाळी १२ वाजताच्या सुमारास तुळींंज पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस आत्मवल्भ कॉम्प्लेक्स येथे पाण्याने भरलेल्या खड्ड्यात त्यांचा मृत्यूदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे. तसेच मृतदेह पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
खड्ड्यात पडून वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू
written By Roshan Chinchwalkar
virar
नालासोपारा पूर्वेकडील आत्मवल्भ इमारतीच्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. याच खड्ड्यात पडून एका ६० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

संबंधित लेख