HomeमहामुंबईपालघरFake News: मिरारोड स्थानकात रेल्वे समोरासमोर आल्याची अफवा

Fake News: मिरारोड स्थानकात रेल्वे समोरासमोर आल्याची अफवा

Subscribe

याप्रकरणी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांनी दोन लोकल समोरासमोर आल्याचे सांगणारा व्हिडीओ खोटा असुन अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगितले.

भाईंदर : पश्चिम रेल्वेवरील मिरारोड रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी दोन रेल्वे एकमेकांसमोर आल्याचा खोटा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. रेल्वे प्रशासनाने भाईंदर रेल्वे स्थानकात मेल गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सिग्नल लावले होते. त्यामुळे दोन गाड्या एकामागे एक उभ्ेया असल्याचे सांगितले आहे. मिरारोड स्थानकात समोरासमोर दोन रेल्वे आल्याची अफवा असल्याचे रेल्वे प्रशासनाने खुलासा केला आहे. मिरारोड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ वर विरारच्या दिशेने जाणारी लोकल बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास थांबली होती. त्याच मार्गिकेवर विरारला जाणारी दुसरी लोकल थांबलेली होती. कारण भाईंदर स्थानकात एका लांब पल्ल्याच्या गाडीत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ती गाडी उभी होती. लोकल ही दोन्ही बाजूने चालवली जाते. त्याची कोणतीही खात्री न करता त्याचा व्हिडिओ काढत दोन लोकल समोरासमोर आल्याचे एका तरुणाने चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. याप्रकरणी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांनी दोन लोकल समोरासमोर आल्याचे सांगणारा व्हिडीओ खोटा असुन अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगितले.

 

मुंबईच्या दिशेने एकामागे एक ट्रेन आल्या होत्या. त्यात काहीतरी खोडसाळपणा करून त्याचा व्हिडीओ बनवून त्यात दोन लोकल रेल्वे एकमेकांच्या समोर आल्या आहेत. सुदैवाने कोणतीही घटना घडली नाही. तरी देखील व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्याची पडताळणी केली असता तो व्हिडीओ व बातमी फेक आहे, त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

– विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे


Edited By Roshan Chinchwalkar