Homeमहामुंबईपालघरराज्य उत्पादन शुल्क विभागाची फायर कामगिरी

राज्य उत्पादन शुल्क विभागाची फायर कामगिरी

Subscribe

कागदी पुठ्ठ्यांच्या आड लपवून दादरा नगर हवेली आणि दमण व दिव राज्यात विक्रीसाठी नेले जात असलेले ३०० बॉक्स विदेशी मद्य आढळले. हे सर्व बॉक्स महाराष्ट्राच्या बाहेर विक्रीसाठी नेत असताना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही मोठी कारवाई केली.

डहाणू: डहाणू तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत कागदी पुठ्ठ्यांच्या आड लपवून परराज्यातील मद्य वाहतूक करणारा आयशर टेम्पो जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क, डहाणू विभागाचे निरीक्षक सुनिल एस. देशमुख आणि भरारी पथक, पालघरचे निरीक्षक ए. एस. चव्हाण यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. ही कारवाई ४ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आली. मुंबई-वडोदरा एक्सप्रेस हायवेवरील नरेशवाडी, पो. धुंदलवाडी (ता. डहाणू, जि. पालघर) येथे सापळा रचून टेम्पो जप्त करण्यात आला.गाडीची तपासणी केली असता, कागदी पुठ्ठ्यांच्या आड लपवून दादरा नगर हवेली आणि दमण व दिव राज्यात विक्रीसाठी नेले जात असलेले ३०० बॉक्स विदेशी मद्य आढळले. हे सर्व बॉक्स महाराष्ट्राच्या बाहेर विक्रीसाठी नेत असताना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही मोठी कारवाई केली.

कारवाईदरम्यान आरोपी मुद्देमाल सोडून फरार झाला. त्यामुळे सी.आर. क्र. १६/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असून, राज्य उत्पादन शुल्क विभाग त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक सुधाकर कदम आणि उपअधीक्षक बी. एन. भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास निरीक्षक सुनिल देशमुख करीत आहेत.


Edited By Roshan Chinchwalkar