HomeमहामुंबईपालघरGanesh Naik: वंचित घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध

Ganesh Naik: वंचित घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध

Subscribe

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध लोक उपयोगी योजनांमार्फत वंचित घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

विरार : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध लोक उपयोगी योजनांमार्फत वंचित घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
नेटाळी येथे अ‍ॅग्रीस्टॅक योजना शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री गणेश नाईक बोलत होते. महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामविकास विभाग या तीन खात्यांच्या माध्यमातून ग्रीस्टॅक योजना प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये राबविली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी व त्यांच्या जमिनी, शेतात घेतलेली हंगामी पिके आणि त्यांच्या शेताचे भौगोलिक स्थान ही माहिती एकत्र करून कृषी विषयक इतर संसाधनांचा वापर योग्य रीतीने करणे व आर्थिक योजनांचा लाभ देण्यासाठी केंद्र व राज्य शासन पुरस्कृत पारदर्शक प्रणाली, ज्यामध्ये शेतकर्‍यांची ओळख (फार्मर आयडी) निश्चित केली जाणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य आहे.

हवामान अंदाज, मृदा आरोग्य तपशील आणि योग्य पीक सल्ला मिळण्यासाठी उपयुक्त असून पीक विमा योजनेचा लाभ घेणे सोपे होते. डिजिटल पीक कर्ज मिळवणे सोपे होणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी बोलताना सांगितले. या कार्यक्रमास पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा परिषद सदस्य निता पाटील, उपविभागीय अधिकारी सुनिल माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, जिल्हा कृषि अधिकारी निलेश भागेश्वर आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.


Edited By Roshan Chinchwalkar