विरार : वसईच्या तहसीलदार कार्यालयात प्लास्टिकच्या बाटल्या, कचर्याचे तुकडे, दुर्गंधीने भरलेले डबे तहसीलदार अधिकारी यांच्या दालनाच्या बाजूला असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाला तहसीलदार अधिकार्यांनी केराची टोपली दाखवली आहे,अशी चर्चा आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत शहरातील सर्वत्र ठिकाणी साफसफाई केली जाते. मात्र, वसईच्या तहसीलदार कार्यालयात घाणीचे ढीग साचले आहेत. तहसीलदार कार्यालयात दिवसाला हजारो नागरिक ये- जा करत असतात. यामुळे या नागरिकांनी देखील या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या मजल्यावर तहसीलदारांचे दालन आहे. दालनाच्या बाजूला कचर्याचे ढीग असल्यामुळे नागरिकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहे. याच बाजूला अधिकार्यांचे स्वच्छतागृह आहे. मात्र स्वच्छतागृह दुर्गंधीच्या विळख्यात सापडले आहे. या स्वच्छतागृत पाणी नसल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याठिकाणी अशाच पद्धतीने वापर केला जातो. कोणीच साफसफाई करत नाही. यांमुळे याच दुर्गंधी येऊ लागली आहे. या स्वच्छतागृहाचा अधिकारी तसेच नागरिक वापर करतअसतात,अशी येथील भेट देणार्या नागरिकांची प्रतिक्रिया आहे.