Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईपालघरखासगी मालवाहतूक बोटीने धडक दिल्याने मोठे नुकसान

खासगी मालवाहतूक बोटीने धडक दिल्याने मोठे नुकसान

Subscribe

उत्तन गावातील ’स्वर्गदिप’ मच्छीमार बोट ही मासेमारी करण्याकरिता गेली असताना त्या बोटीला (नौकेला ) २८ फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास ’अद्वैता मुंबई’ ह्या खासगी मालवाहतूक जहाजाने धडक दिल्याने मासेमारी नौकेचे मोठे नुकसान झाले.

भाईंदर : खोल अरबी समुद्रात भाईंदर पश्चिमेच्या उत्तन परिसरातील स्वर्गदीप बोटीला मुंबईच्या ’मुंबई अद्वैता’ या खासगी मालवाहतूक बोटीने धडक देत मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने त्यांच्यावर कारवाई करून नुकसान भरपाईची मागणी मच्छीमारांनी केली आहे. तर सदरील मासेमारीसाठी गेलेली बोट परत निघाली असून आज शुक्रवारी रात्रीपर्यंत किनार्‍यावर येण्याची शक्यता आहे. खोल अरबी समुद्रात मालवाहतूक बोटीने धडक दिल्याने उत्तन येथील मासेमारी बोटीचे अपघातात झाले मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे. उत्तन गावातील ’स्वर्गदिप’ मच्छीमार बोट ही मासेमारी करण्याकरिता गेली असताना त्या बोटीला (नौकेला ) २८ फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास ’अद्वैता मुंबई’ ह्या खासगी मालवाहतूक जहाजाने धडक दिल्याने मासेमारी नौकेचे मोठे नुकसान झाले.

सुदैवाने बोटीवरील सर्व खलाश्यांचे जीव वाचविण्यात मच्छिमारांना यश आले आहे. या अपघातात मासेमारी बोटीचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने अपघात बोटीचा पंचनामा करून पीडितांना योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी मच्छिमारांकडून केली जात आहे. तसेच झालेल्या घटनेची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी मच्छिमारांनी केली आहे.