भाईंदर : मिरा- भाईंदर आणि मुंबईला लागून दहिसर चेकानाका येथे टोल नाका आहे. दहिसर टोल नाक्यावर नेहमीच होणार्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकार्यांसह गुरुवारी सकाळी दहिसर टोलनाका परिसराची पाहणी केली. या पाहणी दरम्यान वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी उपाय योजना करून त्यावर तात्काळ मार्ग काढण्याचे निर्देश अधिकारी आणि टोल ठेकेदाराला देण्यात आले होते. परंतु टोल वसुली करणार्या ठेकेदाराने फक्त नावापुरते काही उपाय केले. त्याने कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी कमी झालेली नाही. टोल ठेकेदाराने परिवहन मंत्री सरनाईक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. सरनाईक यांनी सोमवारी दुपारी टोलनाका परिसराची पाहणी केली असता कोणत्याही उपययोजना केल्या नसल्याचे निदर्शनास आल्याने सरनाईक यांनी पुन्हा ठेकेदाराला शनिवारपर्यंत उपाययोजना करण्याची मुदत दिली. शनिवारी आल्यानंतर उपययोजना केल्या नाही तर मी स्वतः टोलनाका तोडणार, असा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.
मिरा भाईंदर आणि आसपासच्या रहिवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दहिसर टोल नाक्यावर सातत्याने होणार्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. या कोंडीमुळे नागरिकांचा प्रचंड वेळ वाया जात आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा आणि आपत्कालीन वाहने देखील अडथळ्यामुळे प्रभावित होत आहे. या वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबधित अधिकार्यांसह गुरुवारी सकाळी दहिसर टोलनाका परिसराची पाहणी केली होती. वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी उपाय योजना करून त्यावर तात्काळ मार्ग काढण्याचे निर्देश अधिकारी व टोल ठेकेदाराला दिले होते. यावेळी तीन लाईन या हलक्या वाहनांसाठी आणि तीन लाईन मोठ्या वाहनासाठी ठेवण्यात याव्यात जेणेकरून येणारी हलकी वाहने सरळ निघून जातील. टोल नाक्याच्या अगोदर पाचशे मीटर अंतरावर फलक लावण्यात यावेत त्या फलकामुळे वाहन चालकांना कोणत्या रांगेमध्ये जायचे हे समजेल,अशा सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु टोल ठेकेदाराने फक्त नावापुरत्या काही उपययोजना केल्या. त्याचा वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोणताही फायदा होताना दिसत नाही. वाहतूक कोंडी आहे तशीच आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दहिसर टोल नाक्याची पाहणी केली असता हे निदर्शनास आले. यावेळी सरनाईक यांनी शनिवारपर्यंत टोल ठेकेदाराला अल्तीमेटम दिला असून शनिवारपर्यंत उपाययोजना केल्या नाहीत तर मी स्वतः टोलनाका तोडणार असा इशारा सरनाईक यांनी टोल ठेकेदाराला दिला आहे.