Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईपालघरIllegal liquor : दमण बनावटीची अवैध दारू तस्करी लावली उधळून

Illegal liquor : दमण बनावटीची अवैध दारू तस्करी लावली उधळून

Subscribe

त्या टेम्पोची झाडाझडती घेतली असता, टेम्पोच्या आतल्या बाजूला पत्र्याच्याखाली वाहनासह १९ लाख ७० हजार १२० रुपये किमतीची अवैध दारू असा मुद्देमाल सापडला.

जव्हार: जिल्हा पोलीस दलातील परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक डॉ. भागीरथी पवार आणि स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर बुधवारी सकाळी जव्हार पोलीस हद्दीतून एक तपकिरी रंगाच्या आयशर टेम्पोमधून दमण बनावटीची दारू ही सेलवास ते जव्हार – नाशिक मार्गावर वाहतूक होणार असल्याचे समजले.त्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर मानभाव आणि हवालदार विटकर , नंदू गायकवाड, पोलीस अंमलदार बोरसे यांनी केलेल्या पेट्रोलिंगमध्ये जव्हार शहरापासून एक किमी अंतरावर विशाल ढाब्याजवळील रस्त्यावर १०.००- १०.३० वाजताच्या दरम्यान खंबाळा दूरक्षेत्राच्या दिशेने आयशर टेम्पो नाकाबंदीच्या दिशेने येत असताना दिसला. त्या टेम्पोची झाडाझडती घेतली असता, टेम्पोच्या आतल्या बाजूला पत्र्याच्याखाली वाहनासह १९ लाख ७० हजार १२० रुपये किमतीची अवैध दारू असा मुद्देमाल सापडला.हा मुद्देमाल वाहनासह हस्तगत करण्यात आला आहे, वाहन मालक, चालक बंनेसिंग राठोड (वय-३६ रा. इंदोर, मध्य प्रदेश राज्य ) त्यासोबत महेंद्रसिंग रावत (वय २२ रा. राजस्थान राज्य) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ)नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांनी दिली.


Edited By Roshan Chinchwalkar