Friday, March 21, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईपालघरJawhar News: तालुक्यात विक्रमी 11 हजार 486 घरकुले मंजूर

Jawhar News: तालुक्यात विक्रमी 11 हजार 486 घरकुले मंजूर

Subscribe

तसा प्रस्ताव पंचायत समितीमार्फत राज्य शासन व केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. त्यानुसार तत्काळ मंजुरी मिळावी, म्हणून आमदार यांनी पाठपुरवा केला होता. त्यास आत्ता यश आले असून, मुबलक निधी घरकुलांसाठी मिळणार आहे.

जव्हार: आदिवासी आणि दुर्गम भाग असलेल्या जव्हार तालुक्यात केंद्र तथा राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांतून जव्हार पंचायत समिती अंतर्गत तालुकाभरात ११ हजार ४८६ घरकुलांना मंजुरी मिळाल्याने सामान्य कराची रक्कम सत्कार्णी लागल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील गरजू नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी जवळपास १३७ कोटी ८३ लाख, २० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जव्हार तालुक्यातील ४८ ग्रामपंचायती आणि २ ग्रामदान मंडळे अशा गावांतील लाभार्थ्यांना ही घरकुले मिळाली आहेत.काही दिवसांपूर्वी शासनाकडून सर्व्हे करण्यात आला होता. तसा प्रस्ताव पंचायत समितीमार्फत राज्य शासन व केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. त्यानुसार तत्काळ मंजुरी मिळावी, म्हणून आमदार यांनी पाठपुरवा केला होता. त्यास आत्ता यश आले असून, मुबलक निधी घरकुलांसाठी मिळणार आहे.( Jawhar News: Record 11 thousand 486 houses sanctioned in taluka)

तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत पात्र लाभार्थ्याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी कामाला लागली आहेत. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी , विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांनी या कामाला गती दिली आहे. तालुक्यात सर्व ग्रामपंचायतींना तशा सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, घरकुल लाभार्थींना विचारले असता त्यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राज हाके हे आम्हाला लाभार्थ्यांना नेहमीच सहकार्य करत असल्याचे सांगितले. त्यामुळेच अधिकाधिक घरकुल प्रस्ताव जमून नागरिकांची मूलभूत गरज पूर्ण होणार आहे असेही काही महिला लाभार्थ्यांनी सांगितले.

जव्हार तालुक्यात सन २०१६ पासून २०२३ पर्यंत केवळ पाच हजार घरकुलांना मंजुरी मिळत होती. मात्र यंदा शासन आणि प्रशासनाच्या मदतीने घरकुल मंजुरी ही तिप्पट होऊन ११ हजार ४८६ झाली आहे.

– डी .एस.चित्ते, गटविकास अधिकारी


Edited By Roshan Chinchwalkar