Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईपालघरJuchandra News: कचरा भूमीला जूचंद्रमधील नागरिकांचा तीव्र विरोध

Juchandra News: कचरा भूमीला जूचंद्रमधील नागरिकांचा तीव्र विरोध

Subscribe

अगदी रहदारी आणि नागरी वस्ती असलेल्या भागातच हे आरक्षण आहे. कचरा भूमी व सांडपाणी प्रकल्प झाल्यास त्याचा मोठा परिणाम या भागावर होण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

विरार : वसई- विरार शहर महानगर पालिकेच्या कचरा आरक्षित जागेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका ढिसाळ कारभार करत आहे,असे सांगत नागरिक आक्रमक झाले आहेत.पालिका मिळेल त्या ठिकाणी आरक्षण टाकून कचरा भूमी तयार करत आहे,असे देखील म्हणणे आहे.याचाच एक भाग म्हणून नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथील कचरा भूमीच्या मुद्द्यावरून स्वाक्षरी मोहीम घेत नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. गास पाठोपाठ आता नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथील कचरा भूमीच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात टाकण्यात आलेले आरक्षण हटविण्यात यावे, यासाठी नागरिक आक्रमक झाले आहेत. वसई पूर्वेच्या भागात नायगाव जूचंद्र परिसर आहे. मागील काही वर्षांत या भागातील नागरिकरण झपाट्याने वाढले आहे. वसई- विरार महापालिकेने जूचंद्र आणि नायगाव या भागात स्थानक परिसराला लागूनच सर्व्हे क्रमांक २५१ ते २५६, १६७, २०९ आणि ३२५ या जागेत कचरा भूमी आणि सांडपाणी प्रकल्पाचे आरक्षण टाकले आहे. अगदी रहदारी आणि नागरी वस्ती असलेल्या भागातच हे आरक्षण आहे. कचरा भूमी व सांडपाणी प्रकल्प झाल्यास त्याचा मोठा परिणाम या भागावर होण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. ( Juchandra News: Citizens of Juchandra strongly oppose the waste land )

याशिवाय आता भागातील नागरिकरण वेगाने वाढू लागले आहे. मोठ्या संख्येने नागरिक आता नायगाव परिसरात राहत आहेत. भविष्यात ही कचराभूमी तयार झाली तर याचा नागरी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे. यासाठी टाकण्यात आलेले आरक्षण हटविण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यासाठी येथील नागरिक आक्रमक झाले असून याबाबत स्वाक्षरी अभियान राबवली आहे. या मोहिमेत तीन हजारांहून अधिक नागरिकांनी आपला विरोध नोंदविला आहे. भाजपाचे जिल्हा सचिव प्रविण गावडे आणि धरेंद्र कुलकर्णी यांनी बोलताना सांगितले की, या कचराभूमीच्या आरक्षणाला आमचा विरोध आहे. हे कचराभूमीचे आरक्षण हटविण्यात यावे याबाबत ही पालकमंत्री गणेश नाईक तसेच वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्यासोबत ही पत्रव्यवहार सुरू केला असून लवकरच नायगाव स्टेशन येथे दहा हजार सह्यांची मोहीम पूर्ण करणार आहोत.


Edited By Roshan Chinchwalkar