भाईंदर : मिरा- भाईंदर न्यायालय सुरू झाले असून त्याचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते सुरू झाल्यानंतर न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आहे. त्या न्यायालयात एस.एस. जाधव दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मिरा- भाईंदर हे कामकाज बघत आहेत. त्यात प्रथमच भाईंदर पोलीस ठाण्यात गौवंश तस्करीच्या गुन्ह्यात दोन आरोपींना न्यायालयाने ५० हजार रुपये वैयक्तिक दायित्व भरून दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला आहे. यामुळे मिरा भाईंदर मध्ये ’ऑर्डर – ऑर्डर’ सुरू झाली आहे. तसेच या नवीन न्यायालयामुळे मिरा -भाईंदरच्या नागरिकांची ठाणे न्यायालय येथे जाण्याची पायपीट थांबणार आहे.
भाईंदर पोलीस ठाण्यात ९ मार्च रोजी गौवंश जातीच्या जनावरांची विनापरवाना वाहतूक करत बेकायदा कत्तलीसाठी उत्तन घेऊन जात असताना समाजसेवकांनी ती गाडी पोलिसांना पकडून देत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात पोलिसांनी गौवंश जातीचा एक वन्यजीव १७ हजार किमतीचा आणि तीन लाख किंमतीची पिकअप वाहन आणि दोन आरोपी ड्रायव्हर मोमीन तग्गी सिराज अहमद (वय २२ वर्ष), आणि इम्रान जैनुउद्दिन बागवान (वय २८ वर्ष) यांच्यावर प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११ (१) ड, ११ (१) क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली होती. त्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे हे करत आहेत. त्यानंतर त्यांना मिरा -भाईंदर न्यायालयात हजर केले असताना सदरील गुन्हा हा तीन महिने शिक्षेचा असल्याने ५० हजार वैयक्तिक दायित्व ( ५० हजार रुपये जमा ) करण्याचे आदेश देत जामीन दिला आहे. आरोपी तर्फे कामकाज वकील राजदेव पाल, वकिल कणई बिश्वास, वकील अमित पांडे आणि वकील रवी श्रीवास्तव यांनी पाहिले आहे.