भाईंदर : राज्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी दौर्यानिमित्त मिरा-भाईंदर,वसई-विरार आयुक्तालयाला भेट दिली. त्यात त्यांनी पोलीस आयुक्तालयाची माहिती घेतली आणि इमारतीची पाहणी केली. तसेच पोलीस प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला. राज्यमंत्री कदम यांनी पोलीस आयुक्त कार्यालयातील सर्व शाखा, विभाग, नियंत्रण कक्ष, संवाद हॉल यांची पाहणी केली. त्यानंतर मंथन हॉल येथे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयाच्या कामकाजाविषयी सादरीकरण (पीपीटी) करून विस्तृत माहिती दिली. कामाचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आगामी १०० दिवसांमध्ये करावयाच्या कामकाजाबाबत सूचना दिल्या. तसेच अंमली पदार्थ व अवैध वास्तव करणारे परकीय नागरीक यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस आयुक्तालयाचे महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावा विषयी पाठपुरावा करून सदरचे प्रस्ताव मंजूर होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी दिलेल्या भेटीबाबत त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी गृहराज्यमंत्री सर्व पोलीस अधिकार्यांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा देऊन नियोजित कार्यक्रमाकरीता रवाना झाले होते. यावेळी पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सुहास बावचे, प्रकाश गायकवाड, जयंत बजबळे , पौर्णिमा चौगुले ( श्रींगी ) आणि अपर तहसीलदार निलेश गौंड हे उपस्थित होते.