विरार : बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे यांनी वसई तालुक्यातील पूरस्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणी पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त, वसईचे प्रांताधिकारी आणि वाहतूक विभागाचे मुख्य अधिकारी उपस्थित होते. उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर लवकर तोडगा काढावा असा सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
वसई- विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील पेल्हार, वालीव या ठिकाणच्या काही भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले जाते. त्याचा थेट फटका वाहतूक विभागावर होत असतो. त्याच अनुषंगाने बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे यांनी मंगळवार २५ डिसेंबर रोजी पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते.( Mla Vilas Tare: Pre-monsoon inspection tour of MLA Vilas Tare)
तसेच मुंबई -अहमदाबाद महामार्ग रस्त्यालगत अवैधरित्या पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करावी, जेणेकरून महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी होईल, असे वाहतूक विभागाला आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रभागातील गटारांची साफसफाई करून घ्यावीत,तसेच काही गटारे तुटली असतील त्यांची दुरुस्ती करून घ्यावी, रस्त्यावर पुरस्थिती का उद्भवते याचे बारकाईने पाहून काम करण्यात यावे, असे आमदारांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. यामुळे यावर्षी महामार्ग आणि काही ठिकाणी पाणी साचणार नाही, असा विश्वास आमदार तरे यांनी व्यक्त केला आहे.