भाईंदर : मीरारोड पूर्वेच्या शांती इंक्लेव्ह परिसरात राहणार्या ७२ वर्षीय वयोवृद्ध महिलेला दहा डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान डिजिटल अरेस्ट दाखवून तिची २२ लाख ५४ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीय सह माहिती तंत्रज्ञान कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील वयोवृद्ध महिलेला व्हिडिओ कॉल आला. त्यावरून त्या व्यक्तीने आपले नाव अरुण कुमार आहे असे सांगितले. त्याचा बिहार, पंजाब, गुजरात व हिमाचल प्रदेश या ठिकाणी मनी लाँड्रींगचा फार मोठा व्यवसाय असून त्यात मोठा फ्रॉड झाला आहे. असे सांगून त्यांनी दुसर्या रविकुमार नावाच्या बनावट पोलीस अधिकार्यास व्हिडिओ कॉल दिला.
त्यावेळी त्यावेळी समोरची व्यक्ती ही पोलीस होती. त्याच्या अंगावर खाकी व खांद्यावर तीन स्टार होते. त्यावेळी त्याने त्या वयोवृद्ध महिलेला अटकेची भीती घालून सदरची गोष्ट ही कोणाला सांगितल्यावर तुम्हाला स्थानिक पोलिसांकडून अटक होईल अशी धमकी दिली. त्यात त्यांनी आम्हाला सहकार्य करा. आमचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आकाश कुर्हाडे हे आपल्याला सदर केसमधून बाहेर काढतील असे सांगून रोज वेगवेगळ्या बँक अकाउंटचे नंबर देऊन त्या महिलेच्या बँक खात्यातून एकूण २२ लाख ५४ हजार रक्कम ही घेतली आणि आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात फसवणूक सह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अशोक उगले हे करत आहेत.