Homeमहामुंबईपालघरमीरा- भाईंदर पोलिसांकडून नाकाबंदीचे आयोजन

मीरा- भाईंदर पोलिसांकडून नाकाबंदीचे आयोजन

Subscribe

दोन दिवसांत २२३६ वाहनांची तपासणी करुन ४३५ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. भविष्यातही अशाच प्रकारे कारवाई सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १, कार्यक्षेत्रामध्ये नव्याने २३६ नवप्रविष्ठ पोलीस अमंलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मीरा- भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयाच्या अधिकारक्षेत्रामध्ये मालमत्तेच्या गुन्हयांना प्रतिबंध व्हावा तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मीरा- भाईंदर शहरामध्ये सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले आहे. मीरा -भाईंदर परिमंडळ १ , मीरारोड कार्यक्षेत्रामध्ये २० फेब्रुवारी रोजी रात्री ७ ते ९ वाजेपर्यंत २९ ठिकाणी ऑलआऊट नाकांबदी लावण्यात आली होती. त्यामध्ये १३३७ वाहने तपासण्यात आली .वाहतुकीचे नियमाचे उल्लंघन करणार्‍या २६९ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच २१ फेब्रुवारी रोजी ११ ते १ वाजेपर्यंत २९ ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ८९९ वाहने तपासण्यात आली. यावेळी वाहतुकीचे नियमाचे उल्लंघन करणार्‍या १६६ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दोन दिवसांत २२३६ वाहनांची तपासणी करुन ४३५ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. भविष्यातही अशाच प्रकारे कारवाई सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

शहरातील नागरिकांनी वाहन चालवतांना परवाने आणि आवश्यक कागदपत्र सोबत बाळगावी. दुचाकी वाहनावर ट्रिपल सिट तसेच विना हेल्मेट फिरु नये, आपले दुचाकीस कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवू नये, दारु अथवा अमली पदार्थ प्राशन करुन वाहन चालवू नये, दुचाकीवर घोषणा देत हुल्लडबाजी करत फिरु नये, तसेच पालकांनी आपल्या १८ वर्षांखालील बिना परवाना प्राप्त पाल्यास वाहन चालवण्यास देवू नये असे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्‍या इसमांवर यापुढेही नियमित अशीच कारवाई सुरु राहणार असून नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले आहे.