Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईपालघरPalghar Accident: विक्रमगड- मनोर रस्त्यावर अपघातात तरुणीचा मृत्यू

Palghar Accident: विक्रमगड- मनोर रस्त्यावर अपघातात तरुणीचा मृत्यू

Subscribe

रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भोपोली गावाच्या हद्दीत भरधाव वेगात असताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकून अपघात झाला.

पालघर : विक्रमगड- मनोर रस्त्यावर भोपोली गावच्या हद्दीत शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकी झाडाला धडकून झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. आरती नरेश बसवत (वय.२०) असे मयत तरुणीचे नाव असून ती पालघर तालुक्यातील वसरोली गावाची रहिवाशी होती. दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री आकाश प्रकाश तांडेल हा आरती बसवतसह त्याच्या दुचाकीवरून विक्रमगड तालुक्यातील तलावली येथून विक्रमगड- मनोर रस्त्यामार्गे दुर्वेस येथे जात होता.( Palghar Accident: Young girl dies in accident on Vikramagad-Manor road )

रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भोपोली गावाच्या हद्दीत भरधाव वेगात असताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकून अपघात झाला. अपघातात दुचाकीच्या पाठीमागे बसलेली आरती बसवत गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक आकाश तांडेल गंभीर जखमी झाला होता, त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात प्रकरणी दुचाकी चालक आकाश तांडेल विरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Edited By Roshan Chinchwalkar