Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईपालघरबलात्कार करणार्‍या आरोपीला गुजरातमधून अटक

बलात्कार करणार्‍या आरोपीला गुजरातमधून अटक

Subscribe

त्याला सोमवारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वसई: मित्राच्या मुलीसह तिच्या दोन मैत्रीणींवर बलात्कार करणार्‍या आरोपी कमलेश कदम याला विरार पोलिसांनी गुजरातमधील सुरत येथून अटक केली. आरोपीला मंगळवारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपी कमलेश कदम (४५) हा विरारमध्ये राहतो. त्याचा मित्र तुरुंगात असल्याने त्याने पत्नी आणि मुलीला सांभाळ करण्याची विनंती केली होती. त्यानंतर काही दिवसांनी मुलीची आई घर सोडून गेल्यानंतर पीडित मुलगी एकटीच राहिली. ती एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी कदम याने तिच्यावर बलात्कार करण्यास सुरूवात केली. या मुलीच्या दोन अन्य मैत्रीणींनाही त्याने आपले लक्ष्य बनवले. सख्ख्या बहिणी असलेल्या दोन्ही मुली १३ वर्षांच्या आहेत. मागील दिड महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी सोमवारी १३ वर्षांच्या मुलीने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विरार पोलिसांनी आरोपी कमलेश कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र तो फरार होता. विरार पोलिसांच्या पथकाने गुजरातच्या सुरत येथील कदम याला अटक केली. त्याला सोमवारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


Edited By Roshan Chinchwalkar