पालघर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या केल्याचं प्रकरण अजून ताजेच आहे. अशातच पालघर येथील शिंदेंच्या शिवसेनेतील पदधिकारी आणि समाजिक कार्यकर्ते अशोक धोडी हे आठ दिवसांपासून बेपत्ता आहेत. अशोक धोडी यांचं अपहरण केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. यामागे दारू माफिया असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
एक आठवडे झाले, तरी पोलिसांकडून तपास केला जात नाही, असं अशोक धोडी यांचे सुपुत्र आकाश यांनी म्हटल आहे. याप्रकरणावर पालघर पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतेही भाष्य करण्यात येत नाही.
हेही वाचा : ‘CM’च्या निकटवर्तीय नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, ठाकरे लवकरच फडणवीसांचे…
आकाश धोडी यांनी म्हटलं, “पालघर जिल्ह्यातील अवैध दारूविक्रीविरोधात माझे वडील सातत्याने आवाज उठवत आले आहेत. वडिलांच्या अपहरणामागे अवैध दारू विक्रेते आहेत. मी पोलिसांना सगळी माहिती दिली आहे. सगळे पुरावे दिले आहेत. तरीही, पालघर पोलिसांनी फक्त हरवल्याची तक्रार दाखल करून घेतली आहे.”
अशोक धोडी यांच्या पत्नी लता धोडी म्हणाल्या,”पतीने 20 जानेवारी सायंकाळी 6 वाजता मला केला आणि सांगितलं की, ‘त्यांच्यासाठी रात्रीचे जेवण बनवावे.’ मात्र, बोलणे झाल्यावर काही वेळानंतर त्यांचा मोबाइल बंद लागला. ते घरी सुद्धा आले नाहीत. आम्हाला त्यांची काळजी वाटत आहे.”
सात दिवसांपासून धाडी हे बेपत्ता आहेत. तरीही फक्त हरवल्याची तक्रार करून घेणे आणि तपासात दिरंगाई दाखवणे, या प्रकारामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
हेही वाचा : सैफच्या घरातील अन् अटकेत असलेल्याचे फिंगरप्रिंट जुळत नाहीत? फडणवीस म्हणाले, मी स्पष्ट करतो की…