Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईपालघरचारोटी टोल नाक्यावर प्रथमच अत्याधुनिक रुग्णवाहिका दाखल

चारोटी टोल नाक्यावर प्रथमच अत्याधुनिक रुग्णवाहिका दाखल

Subscribe

त्यामुळे टोल नाक्यावर सध्या अत्याधुनिक प्रथम उपचार व्हावा याकरिता एक सुसज्ज अत्याधुनिक सेवा मिळेल अशी रुग्णवाहिका सेवेत दाखल करण्यात आली आहे.

डहाणू: मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील चारोटी टोल नाक्यावर अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेत दाखल झाली आहे. महामार्गावर नेहमी अपघातांचे सत्र सुरूच असल्याने वैद्यकीय सुविधा वेळेवर न उपलब्ध झाल्यास अपघातात दुर्दैवी मृत्यू होतो. काही वेळेस टोल नाक्यावरील रुग्णवाहिका ही एखाद्या रुग्णाला दुसर्‍या रुग्णालयात नेण्यास व्यस्त असल्याने दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याकारणाने एखाद्या रुग्णाला दवाखान्यात पोचवण्यास उशीर होतो.त्यामुळे नाहक जीव गमावावा लागतो. त्यामुळे टोल नाक्यावर सध्या अत्याधुनिक प्रथम उपचार व्हावा याकरिता एक सुसज्ज अत्याधुनिक सेवा मिळेल अशी रुग्णवाहिका सेवेत दाखल करण्यात आली आहे.

रुग्णवाहिकेमधील सुविधा

या रुग्णवाहिकेमध्ये एखाद्या रुग्णालयातील अपघाती वॉर्ड रचनेप्रमाने सर्व सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णवाहिका राजस्थानवरून येथील सेवेत दाखल झाली आहे. अशाच काही रुग्णवाहिका या येथील उपजिल्हा रुग्णालय, किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात याव्यात, अशी मागणी आता स्थानीय नागरिकांकडून करण्यात येत आहे.