HomeमहामुंबईपालघरSummer:वीजपुरवठयाच्या कमी दाबामुळे भर उन्हात नागरिक हैराण

Summer:वीजपुरवठयाच्या कमी दाबामुळे भर उन्हात नागरिक हैराण

Subscribe

दीडशे वोल्टपेक्षा कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने घरगुती वापरातील विजेवर चालणारी उपकरणे काम करेनाशी झाली आहेत.

मनोर: महावितरण कंपनीच्या सवरखंड उपकेंद्रांतून ढेकाळे फिडर द्वारे महामार्गालगतच्या गावांना वीजपुरवठा केला जातो. ढेकाळे फिडरवर सुमारे 22 गावे आणि सुमारे शंभरपेक्षा अधिक पाड्यांना वीजपुरवठा पोहोचवला जात आहे.फिडरपासून पन्नास ते साठ किलोमीटर अंतराच्या विजवाहिन्या आणि आठ ते दहा टॅब लाइन मार्फत गाव पाड्यांना वीजपुरवठा सुरू आहे. साधारणपणे मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून उकाडा वाढल्यानंतर विजेच्या मागणीत वाढ झाली होती.एप्रिल महिन्यापासून ढेकाळे फिडरवरील शेवटच्या टोकाला असलेल्या गुंदावे,दहिसर तर्फे मनोर आणि साखरे आदी गावांना कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. दीडशे वोल्टपेक्षा कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने घरगुती वापरातील विजेवर चालणारी उपकरणे काम करेनाशी झाली आहेत.

भाजीपाला आणि दुग्धजन्य पदार्थ नासण्याचे प्रमाण वाढल्याने गृहिणींना गैरसोय होत आहे.विजेच्या कमी दाबामुळे रात्रीच्या वेळी पंखे वेगाने फिरत नसल्याने घामाघूम होत रात्र काढावी लागत आहे.कमी दाबामुळे एसी आणि कुलर चालत नसल्याने गर्मीचा उन्हाळ्यामध्ये थंड हवेसाठी एसी कुलर खरेदीला केलेला खर्च पाण्यात गेल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकर्‍यांचे मोटार पंप चालत नसल्याने भाजीपाला लागवडीला पाणीपुरवठा करण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे. रात्रभर जागून भाजीपाला लागवडीला पाणीपुरवठा करून रोपे जगवली जात आहेत.