Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईपालघरBhayander News: आरोपीला आठ तासांच्या आत ठोकल्या बेड्या

Bhayander News: आरोपीला आठ तासांच्या आत ठोकल्या बेड्या

Subscribe

त्यांच्या सदरील व्यावसायिक ग्रीलचे कुलूप तोडून त्यातून आत प्रवेश करत टेबलवर ठेवलेल्या लोखंडी पेटीतील सात लाख रुपये रोख रक्कम दुकान फोडून चोरून नेल्या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भाईंदर : मिरारोडमध्ये भंगार व्यावसायिकाच्या दुकानाचे लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून नेल्या प्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील प्रकरणी पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून आरोपीला आठ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. मिरारोड पूर्वेच्या हटकेश परिसरातील राज लाइफस्टाईल बिल्डिंग च्या जवळ असलेल्या ग्रीन अपार्टमेंटमधील गाळा क्र. ११ मध्ये भंगार व्यावसायिक बिस्मिल्ला मुजावर हे २० फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान त्यांच्या धर्मगुरूंचे दर्शन घेण्यासाठी अंकलश्वर (गुजरात) येथे गेले होते. त्यांच्या सदरील व्यावसायिक ग्रीलचे कुलूप तोडून त्यातून आत प्रवेश करत टेबलवर ठेवलेल्या लोखंडी पेटीतील सात लाख रुपये रोख रक्कम दुकान फोडून चोरून नेल्या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास उकल करण्याच्या सूचना दिल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक व सीसीटीव्हीचा तपास व गोपनीय माहितीवरून आरोपी इस्माईल इसाक शेख (वय २७ वर्ष रा. साईबाबा चाळ, जनता नगर डोंगरी, काशीगाव) यास अटक केली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे हे करत होते. त्यांनी सदरील आरोपीला तांत्रिक तपास करून गुन्हा दाखल होताच आठ तासाच्या आत २३ फेब्रुवारी आरोपीला अटक करत बेड्या ठोकल्या आहेत. तर सात लाख रुपयांपैकी ४ लाख ५० हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर उर्वरित मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर अटक आरोपीला २८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.


Edited By Roshan Chinchwalkar