Homeमहामुंबईपालघरगृहसंकुलांना मलवाहिनी जोडण्याचे काम स्वखर्चाने करावे लागणार

गृहसंकुलांना मलवाहिनी जोडण्याचे काम स्वखर्चाने करावे लागणार

Subscribe

सुविधा न घेता नागरिक शुल्क भरत आहेत. महापालिकेकडून शहरात राबविण्यात येणार्‍या भुयारी गटार योजनेंतर्गत एकूण ९९ किमी लांबीच्या मुख्य मलवाहिन्या अंथरण्यात आल्या आहेत.

भाईंदर : मिरा -भाईंदर शहरात गेल्या 9 ते १० वर्षांपासून भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे, त्या परिसरातील इमारती, गृहसंकुलांना ठराविक रक्कम भरून सेप्टिक टँकचे कनेक्शन मुख्य मलवाहिनीला जोडण्याचे काम पूर्वी केले जात होते. यापुढे महापालिका हे शुल्क न घेता मलवाहिनी जोडण्याच्या कामासाठी महापालिकेने कंत्राटदारांचे पॅनल तयार केले आहे. या पॅनलवरील कंत्राटदारांकडूनच इमारती, गृहसंकुलांना मलवाहिनी जोडून घेण्याचे काम स्वखर्चाने करावे लागणार आहे. यासाठी महापालिकेने धोरण निश्चित केले आहे. मिरा – भाईंदर शहरात गेल्या ९ ते १० वर्षांपासून भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. तेव्हापासून महापालिका नागरिकांकडून मलवाहिनी शुल्क वसूल करत आहे. सुविधा न घेता नागरिक शुल्क भरत आहेत. महापालिकेकडून शहरात राबविण्यात येणार्‍या भुयारी गटार योजनेंतर्गत एकूण ९९ किमी लांबीच्या मुख्य मलवाहिन्या अंथरण्यात आल्या आहेत.

या इमारती, गृहसंकुलांच्या सेप्टिक टँकपासून ते मुख्य मलवाहिनीला जोडण्यासाठी प्रचलित पध्दतीनुसार महापालिकेकडून मलवाहिनी अंथरण्यात येत होती. त्याचे शुल्क संबंधित इमारती, गृहसंकुलाकडून वसूल करण्यात येत होते. हे काम करण्यासाठी महापालिकेवर जास्तभार पडत होता. त्यामुळे हा खर्च कमी करण्यासाठी महापालिकेने नवीन मलवाहिनी जोडणीचे धोरण निश्चित केले आहे. या धोरणात गृहसंकुल, इमारतीच्या सेप्टीक टँकपासून मुख्य प्रवेशव्दारापर्यंत त्यांनी स्वखर्चाने एनपी ४ ग्रेड आरसीसी व्यासाची पाईप वापरून मलवाहिनी अंथरणे बंधनकारक करण्यात आले आहे. इमारतींच्या प्रवेशव्दार ते मुख्य मलवाहिनी दरम्यान विविध सेवांच्या केबल, वाहिनी टाकण्यात आलेल्या आहेत. त्याठिकाणी खोदकाम करताना काळजीपूर्वक मलवाहिनी अंथरणे गरजेचे आहे. खोदकाम करताना दुसर्‍या वाहिन्या तुटू नयेत. तुटल्यास यामध्ये आर्थिक नुकसान व नागरिकांना त्रास सहन करावे लागतो. त्यामुळे महापालिकेने या खर्चात बचत करण्यासाठी दर मंजूर करुन ठेकेदाराचे पॅनेल तयार केले आहे. या ठेकेदाराकडूनच इमारतीतील सोसायटीने होणारा खर्च भरून मलवाहिनी अंथरण्याचे काम करुन घेणे बंधनकारक केले आहे. तसेच महापालिकेकडून २५ हजार रुपयांचे मलजोडणी शुल्क देखील वसूल केले जाणार आहे. या दुहेरी वसुलीमुळे लोकांच्या डोक्यावर आर्थिक भर पडणार असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


Edited By Roshan Chinchwalkar