Homeमहामुंबईपालघरपालघरमध्ये आज महासंस्कृती महोत्सव

पालघरमध्ये आज महासंस्कृती महोत्सव

Subscribe

महासंस्कृती महोत्सवामध्ये दु.4ते 6 या वेळेमध्ये पालघर परिसरातील शाळा महाविद्यालयांचे सांस्कृतिक कार्यक्रम सिडको मैदान, बोईसर रोड येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी बोडके यांनी सांगितले.

वसईः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त तसेच त्यांच्या जीवनावर आधारीत त्यांचे विचार महानाट्याद्वारे जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी महानाट्याचे आयोजन तसेच राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे अदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ, कला व संस्कृतीचे जतन संवर्धन आणि स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात , अज्ञात क्रांतीवीरांच्या शौर्यगाथा जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी महासंस्कृती महोत्सव व महानाट्याचे आयोजन 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली. सदर कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य व नियोजनबद्ध पद्धतीने होण्यासाठी तसेच समन्वय व सनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे सदस्य सचिव निवासी उपजिल्हाधिकारी आहेत. महासंस्कृती महोत्सवामध्ये दु.4ते 6 या वेळेमध्ये पालघर परिसरातील शाळा महाविद्यालयांचे सांस्कृतिक कार्यक्रम सिडको मैदान, बोईसर रोड येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी बोडके यांनी सांगितले.

7 फेब्रुवारी रोजी ठाणे येथील प्रेरणा कला संस्था ‘शिवबा नाट्य’ रात्री 7 ते 10 या वेळेत सादर करणार आहे. एक संगीत संध्या ही संस्था ‘शिवराय’ हे नाट्य दिनांक 8 फेब्रुवारी रोजी रात्री 7 ते 10 या वेळेत सादर करणार आहे. प्रतिभा आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था ‘महाराष्ट्र दर्शन’ हा कार्यक्रम 10 फेब्रुवारी रोजी रात्री 7 ते 10 या वेळेत सादर करणार आहे. नार्थ रे मेडिया प्रा. लि. ही संस्था लोकरंग हा कार्यक्रम दि. 11 फेब्रुवारी रोजी रात्री 7 ते 10 या वेळेत सादर करेल, मुंबई येथील जनजागृती समाज प्रबोधन कार्य ही संस्था ‘वारसा संस्कृतीचा’ हा कार्यक्रम ि11 फेब्रुवारी रोजी रात्री 7 ते 10 या वेळेत सादर करेल. या महोत्सवांमध्ये ऐतिहासिक वस्तूचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विरार येथील कलाकृती इन्व्हेंट कंपनी ही संस्था ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, नाणी प्रदर्शन, मोडी लिपीतील पत्रांचे प्रदर्शन तसेच ऐतिहासिक दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सकाळी 10 ते रात्री 10 यावेळेत आयोजित करणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी महानाट्य आणि महासंस्कृती महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी बोडके यांनी केले आहे.