वसई: वसईत दोन मोटर सायकल्सची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर या अपघातात एक जण गंभीर जखमी आहे. वसई पूर्वच्या सुरक्षा स्मार्ट सिटी येथे शनिवारी रात्री ९ च्या सुमारास हा अपघात घडला आहे.वसई पूर्वेच्या राजावली परिसरात सुरक्षा स्मार्ट सिटी आहे. वालीव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री ९ च्या सुमारास भरधाव वेगात असलेली एक्टिवा गाडी तसेच एक दुचाकी समोर समोर धडकली. त्यामध्ये गाडीवर बसलेले तीन जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.रस्ता लहान असल्याने वाहनांना अंदाज न आल्याने दोन्ही वाहने एकमेकांवर धडकली आणि हा अपघात घडला.( Vasai Accident: Two bikes collided head on, three died)
Vasai Accident: दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या,तिघांचा मृत्यू
written By Roshan Chinchwalkar
vasai
जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.रस्ता लहान असल्याने वाहनांना अंदाज न आल्याने दोन्ही वाहने एकमेकांवर धडकली आणि हा अपघात घडला.

संबंधित लेख