Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईपालघरVasai Crime: ट्रान्सफॉर्मर चोरणार्‍या टोळीला अटक

Vasai Crime: ट्रान्सफॉर्मर चोरणार्‍या टोळीला अटक

Subscribe

अजय चौधरी (३२) यांनी १२ फेब्रुवारीला नायगांव पोलीस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर पोलिसांनी आरोपी खान (२६), अनिल यादव (२२) या दोघांना उत्तरप्रजेमधून २३ फेब्रुवारीला ताब्यात घेऊन अटक केले आहे.

वसई: ट्रान्सफॉर्मर चोरणार्‍या तीन आरोपींच्या सराईत टोळीला उत्तरप्रदेशमधून अटक केले आहे. आरोपींकडून ५ गुन्ह्यांची उकल करत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करायला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे.कामणच्या कोल्ही चिंचोटी परिसरातील जाधववाडी येथे महावितरणने लावलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून कॉपर आणि ऑइल ११ ते १२ फेब्रुवारीच्या दरम्यान चोरीला गेले होते. चोरट्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी १० हजार रुपये किंमतीचे ३०० लीटर ऑइल आणि ८० हजारांचे ६०० किलो कॉपर उघड्यावरून चोरी करून नेले होते. अजय चौधरी (३२) यांनी १२ फेब्रुवारीला नायगांव पोलीस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर पोलिसांनी आरोपी खान (२६), अनिल यादव (२२) या दोघांना उत्तरप्रजेमधून २३ फेब्रुवारीला ताब्यात घेऊन अटक केले आहे.

दोन्ही आरोपींनी पोलीसांना दिलेल्या माहितीच्या आधारे सक्रिय सहभागी आरोपी जयसिंग चव्हाण (३६) याला नवीन पनवेल येथून अटक केले आहे.आरोपींकडून नायगांवच्या गुन्ह्याची उकल करत याव्यतिरिक्त आणखी चार ट्रान्सफार्मर व त्यातील ऑइलच्या गुन्ह्यांची उकल करत ६२० किलो कॉपर, २० लीटर ऑईल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार असा ६ लाख ५२ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीकडून नायगाव येथील २, वाडा येथील १ आणि मांडवी येथील २ असे एकूण ५ गुन्ह्यांची उकल केली आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सपोनि सोपान पाटील व सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गीते, सहा. फौजदार रमेश भोसले, पोलीस हवालदार मुकेश पवार, रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, राजाराम काळे, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांत ठाकूर, अकिल सुतार, राहुल कर्पे, अनिल साबळे, अजित मैड, प्रतिक गोडगे, राजकुमार गायकवाड, मसुब रामेश्वर केकान, अविनाश चौधरी आणि सहा फौजदार संतोष चव्हाण यांनी केली आहे.”


Edited By Roshan Chinchwalkar