HomeमहामुंबईपालघरViral Letter: मिरा- भाईंदर जिल्हा होणार असल्याचे वायरल पत्र खोटे

Viral Letter: मिरा- भाईंदर जिल्हा होणार असल्याचे वायरल पत्र खोटे

Subscribe

या योजनांसाठी शासन दरबारातून मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो. त्यामुळे आता तरी मीरा भाईंदर, कल्याण व जव्हार या नवीन जिल्ह्यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो.

भाईंदर : मीरा- भाईंदर जिल्हा घोषित करणार अशा अफवा पसरविणारा व्हायरल पत्र हे बोगस असून सध्या महाराष्ट्रात ३६ जिल्हे असून कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा विभागात विभागणी करण्यात आलेली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमावर एक यादी फिरत असून त्यामध्ये महाराष्ट्रात पुन्हा २१ नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार असल्याचा मजकूर टाकलेला आहे. या वायरल मेसेज बाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विचारले असता त्यांनी हा फेक मेसेज आहे, यावर कोणीही विश्वास ठेऊ नये असे सांगितले आहे. सध्या राज्यात शासनाकडून अनेक विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांसाठी शासन दरबारातून मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो. त्यामुळे आता तरी मीरा भाईंदर, कल्याण व जव्हार या नवीन जिल्ह्यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो.

नवीन जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा जिल्हा न्यायालयाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च आहे. जिल्हा बनण्यासाठी अनेक वर्ष अगोदर नियोजन करावे लागते. समाज माध्यमावर असे चुकीचे मेसेज व्हायरल करून नागरिकांची दिशाभूल कोणीही करु नये. तसेच नागरिकांनी अशा फेक मेसेज वर विश्वास ठेवू नये असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.