Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईपालघरWomans Day: पालिकेच्या परिवहन बसमधून महिलांसाठी मोफत प्रवास

Womans Day: पालिकेच्या परिवहन बसमधून महिलांसाठी मोफत प्रवास

Subscribe

सामाजिक, राजकीय, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीमध्ये महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकणार्‍या रॅली, मोर्चे परिषदा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. यादिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

विरार : वसई- विरार शहर महानगरपालिकेने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील महिलांसाठी एक दिवशीय परिवहन वाहतूक मोफत प्रवास देणार असल्याचे पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी नियोजले आहे. यामुळे शहरातील महिलांना दिवसभरात मोफत प्रवास करता येणार आहे. शनिवार दिनांक ८ मार्च रोजी जगभरातील अनेक देशांमध्ये जागतिक महिला दिन साजरा केला जातो महिलांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, महिला सक्षमीकरण आणि समानतेचे समर्थन करण्यासाठी सर्व एकत्र येत असतात. सामाजिक, राजकीय, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीमध्ये महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकणार्‍या रॅली, मोर्चे परिषदा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. यादिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.( Woman’s Day: Free travel for women on municipal transport buses)

राजकारणापासून विज्ञान, कला, संस्कृती आणि इतरही विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांचा सन्मान केला जातो. याच अनुषंगाने महिलांना प्रोत्साहन देणेकामी वसई विरार शहर महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमध्ये मोफत बस प्रवास देण्याबाबत एक विशेष संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील मोफत बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केले आहे.


Edited By Roshan Chinchwalkar