मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आरोग्याच्या कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची बहीण आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचा राजीनामा घेण्यास उशिर झाला, हा राजीनामा आधीच घेतला गेला पाहिजे होता. खरेतर त्यांना मंत्रिमंडळातच घ्यायला नको पाहिजे होते, असे म्हटले होते. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आज पंकजा मुंडे या त्यांच्या भेटीसाठी गेल्या आहेत.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे या प्रथमच धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी गेल्या आहेत. धनंजय मुंडे यांचा शासकीय बंगला सातपुडा येथे गुरुवारी रात्री 9 वाजता दरम्यान पोहोचल्या. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची भेट घेणाऱ्या पंकजा या फडणवीस मंत्रीमंडळातील पहिल्या मंत्री असल्याचे म्हटले जात आहे.
धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया काही दिवसांपूर्वीच झाली. या शस्त्रक्रियेनंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीचा खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. याच दरम्यान धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडली असल्याची चर्चा आहे. 20 फेब्रुवारी धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन त्यांना बेल्स पाल्सि नावाच्या आजाराचे निदान झाल्याची माहिती दिली होती. या दुर्मिळ आजारामुळे सलग दोन मिनिटे ही मला बोलता येत नाही, असेही त्यांनी म्हटले होते. मंत्री असताना सलग तीन कॅबिनेट मिटिंगला ते गैरहजर होते. यानंतर 4 मार्च रोजी धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर आज पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांची प्रकृती बरी नसल्याने भेट घेतल्याचे बोललं जात आहे.
हेही वाचा : Suresh Dhas : आमदार सुरेश धस आरोपी सतीश भोसलेला म्हणतात, खोक्या सॉरी बाबा…; ऑडिओ क्लिप व्हायरल