Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईChhava Craze : छावाच्या लोकप्रियतेचा पोलिसांना फायदा, थिएटरच्या गर्दीत सापडले वॉन्टेड आरोपी

Chhava Craze : छावाच्या लोकप्रियतेचा पोलिसांना फायदा, थिएटरच्या गर्दीत सापडले वॉन्टेड आरोपी

Subscribe

'छावा' चित्रपट पाहण्याचा हा उत्साह पुणे पोलिसांच्या पथ्यावर पडल्याचे दिसते आहे. मकोकाचा गुन्हा दाखल असलेले दोन आरोपी छावा बघायला आले आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

Pune Police Crime Branch : पुणे : सध्या देशभरात केवळ विकी कौशल अभिनीत छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 12 दिवस होऊन गेले, तरीही या चित्रपटाची क्रेझ काही कमी होताना दिसत नाही. या चित्रपटाने कमाईचे देखील अनेक विक्रम मोडले आहेत. अशातच एक गमतीची गोष्ट समोर येताना दिसते आहे. ‘छावा’ चित्रपट पाहण्याचा हा उत्साह पुणे पोलिसांच्या पथ्यावर पडल्याचे दिसते आहे. मकोकाचा गुन्हा दाखल असलेले दोन आरोपी छावा बघायला आले आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. (pune police crime branch arrested 2 from hadapsar while watching vicky kaushal chhava movie)

‘छावा’ चित्रपट बघण्यासाठी आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने अटक केली. हडपसर भागात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. धर्मेनसिंग उर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड असं अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावं आहेत. हे दोघेही दिघी येथील आदर्श नगरमधील शिव कॉलनीमध्ये राहतात. दोन्ही आरोपींवर यापूर्वी मकोका, तसेच एनडीपीएस कायद्याबरोबर शस्त्र कायद्याअन्वये दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा – Bombay HC : चार दिवस सोबत राहिले, मुलीला परिणामांची कल्पना, आरोपीला जामीन देताना काय म्हणाले न्यायालय

या दोघांना थेट चित्रपटगृहामधून अटक करण्यात आली आहे. दोघेही चित्रपट पाहण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आणि हे आरोपी आयतेच पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

असाच काहीसा प्रकार ‘पुष्पा 2’ च्या वेळी देखील घडला होता. एका कुख्यात आरोपीला पुष्पा 2 चित्रपट पाहताना पाचपावली पोलिसांनी अटक केली. नागपूर येथील पाचपावली पोलिसांनी ही कारवाई केली. MPDA गुन्ह्यात आरोपीला 10 महिन्यानंतर अटक झाली. 2024 च्या डिसेंबरमध्ये ही घटना घडली होती.

विशाल मेश्राम अस आरोपीचे नाव आहे. विशाल हा साथीदारांसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सुद्धा ‘पुष्पा 2’ चित्रपट तिकीट खरेदी केलं. तो बसलेल्या सीटच्या मागील बाजूस पोलीस बसून राहिले. तर दुसरे पोलीस पथक बाहेर तैनात होतं.

हेही वाचा – IND vs PAK : भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकले पाकिस्तानचे फलंदाज, वाचा सविस्तर