Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईRahul Gandhi : राहुल गांधींचा अचानक मुंबई दौरा, धारावीमध्ये व्यावसायिकांची भेट; काँग्रेसचा नेमका प्लॅन काय

Rahul Gandhi : राहुल गांधींचा अचानक मुंबई दौरा, धारावीमध्ये व्यावसायिकांची भेट; काँग्रेसचा नेमका प्लॅन काय

Subscribe

मुंबई – काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज (गुरुवार) मुंबई दौऱ्यावर होते. पक्ष संघटना बळकटीसाठी त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी काळात मुंबई महानगर पालिका निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे, मुंबई दौऱ्यात राहुल गांधींनी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीतील काही भागांना भेट दिली.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पदरी मोठे अपयश आले. त्यानंतर आता मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस नेते लागले आहेत. धारावीमध्ये राहुल गांधी यांनी लेदर उद्योगांना भेट दिली. येत्या 10 मार्चपासून संसदेचे अर्थसंकल्यीय अधिवेशन आहे. त्यामध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि अदानी मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

 

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी उद्योग समूहाला देण्यात आले आहे. हा प्रकल्प अदानी समूहाला देण्यास काँग्रेसने सुरुवातीपासून विरोध केला आहे. लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा गाजला होता आणि परिणामकारकही ठरला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतही धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि अदानी उद्योग समूह हा विषय चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांनी धारावीतील लघु उद्योगांना आणि व्यावसायिकांना भेट दिली. धारावी पुनर्विकास प्रकल्पालाही भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, काँग्रेसचे विधानसभा गटनेते विजय वडेट्टीवार, आमदार भाई जगताप, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार सतेज पाटील उपस्थित होते.

हेही वाचा : Jitendra Awahd : केम छो प्रविण भाई दरेकर… सारो छे…, ढोकला-फाफडा मुंबईकरांचे मुख्य अन्न; आव्हाडांचा टोला