Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईरायगडअभिनेता रणवीर सिंग रमला क्रिकेटच्या खेळात

अभिनेता रणवीर सिंग रमला क्रिकेटच्या खेळात

Subscribe

१९८३ च्या विश्वचषक स्पर्धेवर आधारीत चित्रपटात रणवीर नुकताच कपिल देव यांच्या भुमिकेत दिसला होता. या चित्रपटात अभिनय करताना त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी करत हुबेहूब कपिल देव यांची छबी साकारली होती. पण प्रत्यक्षातही तो उत्तम क्रिकेट खेळू शकतो याचा अंदाज कोणालाच नव्हता. पण सातीर्जे गावात मुलां सोबत क्रिकेट खेळताना फटकेबाजी करत त्याने आपली कसब दाखवून दिली.

अलिबाग-: अभिनेता रणवीर सिंग याने अलिबाग तालुक्यातील सातीर्जे गावाला भेट दिली. मात्र त्याची ही भेट गावात क्रिकेट खेळणार्‍या बच्चे कंपनीसाठी अविस्मरणीय ठरली. सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटविणार्‍या रणवीर सिंगने या मुलां सोबत क्रिकेट खेळून त्यांचा उत्साह वाढविला. रणवीर सोबत घालविलेल्या काही क्षणांचा आनंद मुलांच्या चेहर्‍यावर दिसत होता. (Actor Ranveer Singh visited Satirje village in Alibaug taluka for play game of cricket)

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी गेल्या वर्षी अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचात हद्दीत फार्म हाऊस खरेदी केले आहे. सुट्टीच्या काळात दोघेही अलिबागला वास्तव्यास असतात. शनिवार व रविवारी सुट्टीच्या निमित्ताने रणवीर सिंग नुकताच अलिबागला आला होता. त्याने सातीर्जे गावातील माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर उपस्थित होते. परतीच्या प्रवासा दरम्यान गावातील मुले क्रिकेट खेळत असल्याचे रणवीरला दिसले. त्यामुळे त्याने चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. त्यानंतर तो खाली उतरून मुलां सोबत क्रिकेटमध्ये सहभागी झाला. रणवीरने उत्तम फलंदाजी करत त्याने सगळयांनाच अचंबित केले. अभिनयासोबत आपण क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजीही करू शकतो हे त्याने मुलांना दाखवून दिले. मुलांसोबत सेल्फीही काढले.

स्व.मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर त्यांचे मोठे बंधू रवी उर्फ नाना ठाकूर, मालती ठाकूर, मिनाक्षी ठाकूर, कळल ठाकूर आदी उपस्थित होते. राजाभाऊ यांच्या पत्नी प्राची ठाकूर आणि कटुंबातील महिलांनी रणवीरचे औक्षण केले. राजाभाऊयांचे थोरले बंधू अ‍ॅड.प्रवीण ठाकूर यांची मुलगी धनश्री ठाकूर हिच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात रणवीर सहभागी झाला होता.