Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडAlibaug Boat Fire : अलिबागच्या समुद्रात अचानक पेटली बोट; 18 खलाशांची सुखरूप सुटका

Alibaug Boat Fire : अलिबागच्या समुद्रात अचानक पेटली बोट; 18 खलाशांची सुखरूप सुटका

Subscribe

अलिबाग : अलिबाग येथील समुद्रात आज एका बोटीला अचानक आग लागल्याची बातमी समोर आली आहे. अलिबागच्या अक्षी सुमद्रकिनारी असलेल्या बोटीला आग लागल्याचं समजतं. शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास ही आग लागली. बोटीला लागलेली आग भीषण असून धुराचे मोठे लोंढ पाहायला मिळाले. मात्र या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी नौदलाच्या जवानांनी धाव घेत बोटीत असलेल्या खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. (Alibaug Boat Fire Boat suddenly catches fire in sea Navy rescues 18 people)

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग येथे पहाटे चार वाजता एका बोटीला आग लागल्याची घटना समोर आली. आग अक्षी अलिबाग येथे किनाऱ्यापासून 6-7 नॉटिकल मैल अंतरावर राकेश गण यांच्या मासेमारी बोटीला आग लागली. बोटीला आग लागल्याची माहिती मिळताच नौदलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाने बोटीतील सर्व 18 क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे वाचवले.

भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदल वेळीच घटनास्थळी दाखल झाले. बोटीतील सर्व 18 जणांना सुखरूप वाचवले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आगीमुळे बोट एका बाजूला झुकल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

मुंबईत भीषण आग

दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरातील न्यू ग्रेड इंस्टा मीलजवळ असलेल्या सॅलसेट इमारतीला भीषण आग लागली आहे. शुक्रवारी सकाळी 10:45 वाजताच्या सुमारास ही आग लागली. सॅलसेट इमारतीच्या वरच्या भागात आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सॅलसेट इमारत ही रहिवाशी इमारत असल्याचं समजतं. आग लागली त्यावेळी इमारतीत कोणी अडकलं आहे का, याचा तपास अग्निशमन दलाच्या जवानांकडून केलं जात आहे. तसेच, आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याचाही तपास अग्निशमन दलाकडून केला जात आहे.


हेही वाचा – Major Fire : मुंबई, कोल्हापूर, अलिबाग अग्नितांडव; राज्यात एकाच दिवशी तीन ठिकाणी भीषण आग