HomeमहामुंबईरायगडJNPA News : जेएनपीएमध्ये 2 हजार कोटींची विकासकामे, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल...

JNPA News : जेएनपीएमध्ये 2 हजार कोटींची विकासकामे, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची उपस्थिती

Subscribe

उरण : जेएनपीएमधील तब्बल २ हजार कोटींच्या विकास प्रकल्पाचं बंदरे, जहाज वाहतूक व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी उद्घाटन तसेच भूमिपूजन केले आहे. त्याचवेळी बंदराची सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी बोट, दोन स्वदेशी विकसित ७० टी टग आणि तीन फायर टेंडर यांच्या सेवेचा प्रारंभ केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जेएनपीएने २०२४ मध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेसह ७.०५ दशलक्ष टीईयूएस कंटेनर हाताळले आहेत. २०२३च्या तुलनेत यात ११ टक्के वाढ होती. यंदा जानेवारीमध्ये भारत मुंबई कंटेनर टर्मिनलचा (बीएमसीटी) दुसरा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर, जेएनपीएच्या एकूण क्षमतेत आणखी २.४ दशलक्ष टीईयूएस जोडले गेले आहेत. यंदा न्हावा शेवा फ्री पोर्ट टर्मिनलच्या (एनएसएफटी) अद्ययावतीकरणामुळेही बंदराची क्षमता वाढणार आहे.

हेही वाचा…  Raigad News : बेकायदा भरावाविरोधात बोर्ली ग्रामपंचायत आक्रमक, प्रजासत्ताक दिनी मुरुड तहसीलसमोर आंदोलन

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, जेएनपीएच्या तसेच भारताच्या संपूर्ण सागरी क्षेत्रासाठी ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिशील नेतृत्वाखाली, आपल्या परिसंपत्तीवर घाम गाळून, कष्ट करून मूल्य निर्माण करण्याचा एकसंध प्रयत्न केला गेला आहे. त्याचवेळी आमची संपूर्ण टीम नाविन्यपूर्ण मूल्य प्रस्तावांसह क्षमतावर्धन करत निष्क्रिय संसाधनांमधूनही मूल्य निर्माण करण्यासाठी झटत आहे. वाढत्या पायाभूत सुविधांसह, मोठ्या जहाजांना हाताळण्याची क्षमता निर्माण करण्यासह, जेएनपीए भारताच्या जागतिक व्यापाराचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास तयार आहे. उत्पादन ते वस्त्रोद्योग, इलेक्ट्रॉनिक्स ते शेती अशा विविध क्षेत्रांपासून भारताचा व्यापार वाढत असताना, आपली बंदरे क्षमता निमार्ण कार्यात गुंतवणूक करत आहेत तसेच कंटेनरच्या वाढत्या वाहतुकीला आधार देण्यासाठी कार्यक्षम उपाययोजना करत आहेत. एक कोटी टीईयूएस हाताळणाऱ्या जगातील मोजक्या बंदरांपैकी एक म्हणून जेएनपीएची लक्षणीय प्रगती हा २०१४ पासून भारताच्या सागरी क्षेत्राला जगातील सर्वोच्च सागरी देशांपैकी एक बनवण्याच्या दिशेने केलेल्या सरकारच्या प्रयत्नांचा पुरावा आहे, असे सोनोवाल म्हणाले.

सामंजस्य करार

वाढवण बंदर प्रकल्पाच्या विकासासाठी सोनोवाल यांच्या उपस्थितीत प्रमुख सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. वाढवण पत्तन प्रकल्प लिमिटेड (व्हीपीपीएल) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यातील सामंजस्य करारानुसार तरल घाटसह (लिक्विड जेट्टी) वाढवण बंदरात ५० एकर जमीन सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी मॉडेल अंतर्गत) देण्यात आली आहे. ही गुंतवणूक अंदाजे ६४५ कोटी रुपये असून २०३० पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. वाढवण आणि आसपासच्या डहाणू आणि पालघरमधील छोट्या गावांसाठी एकात्मिक कृषी आणि बागायती योजनेचा विकास आणि अंमलबजावणी करण्यासाठी व्हीपीपीएल आणि डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, (डीबीएसकेकेव्हीडी) यांच्यात आणखी एक सामंजस्य करार करण्यात आला. पायाभूत सुविधा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून व्हीपीपीएल आणि हुडको यांच्यात एक मजबूत कार्यरत भागीदारी स्थापन करण्यात आली आहे.

बंदरे, जहाज वाहतूक व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत प्रमुख सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

जेएनपीएमध्ये २ हजार कोटींच्या क्षमता वाढीच्या प्रकल्पांचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी अत्याधुनिक कृषी प्रक्रिया सुविधेच्या विकासाचा शुभारंभ केला. २८४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हा अग्रगण्य उपक्रम भारताच्या कृषी व्यापार पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. बंदर संकुलात २७ एकरांवर पसरलेल्या या अद्वितीय सुविधेमुळे कृषी वस्तूंची प्रक्रिया, साठवणूक आणि वाहतुकीमध्ये परिवर्तन घडणार आहे.

(Edited by Avinash Chandane)