Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडKhalapur News : खालापूर नगरपंचायतीमध्ये घरपट्टी घोटाळा, कुणामुळे उघड झाला घोटाळा

Khalapur News : खालापूर नगरपंचायतीमध्ये घरपट्टी घोटाळा, कुणामुळे उघड झाला घोटाळा

Subscribe

पनवेल : गेल्या महिन्यात नाना कोरडे या कनिष्ठ लिपिकाने केलेल्या घोटाळ्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. या कोरडेने कोट्यवधी रुपये खोट्या स्वाक्षऱ्या करून परस्पर त्याच्या आणि पत्नीच्या खात्यात वळते केल्याचे उघड झाले आहे. अशातच खालापूर नगरपंचायतमध्ये घरपट्टी घोटाळा उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची चौकशीदेखील सुरू झाली आहे.

घरपट्टी घोटाळा जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत झाला आहे. मालमत्ता मालकांनी घरपट्टीची रक्कम ऑनलाईन भरली होती. मात्र, त्यांच्या ऑनलाईन पावत्या कर्मचाऱ्यांच्या नावाने लॉग-ईन करून नष्ट करण्यात आल्या. विशेष म्हणजे लेखापरीक्षणात (ऑडिट) हा घोटाळा उघड झाला आहे.

हेही वाचा…  Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले, श्री विरेश्वर गोगावलेंची इच्छा पूर्ण करणार

लेखापरीक्षणात काय आढळले?

खालापूर नगरपंचायतीची घरपट्टी भरलेल्या 49 पावत्या रद्द केल्या होत्या. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नावाने लॉग-ईन करण्यात आले होते. म्हणजे लोकांनी घरपट्टीची रक्कम भरली आहे. ते पैसे नगरपंचायतीत जमा झाले. मात्र, त्यांच्या ऑनलाईन पावत्या नष्ट करून ते पैसे हडप करण्याचा प्रकार घडला आहे.

हेही वाचा…  Raigad News : कुलाबा किल्ला आणि कनकेश्वर रोपवेचा मार्ग मोकळा, मंत्रिमंडळाची मंजुरी

हे सर्व प्रकरण गंभीर असून लोकांनी कररुपी भरलेल्या पैशांचा अपहार करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, है गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी चौकशी प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी सुरू केल्याची माहिती मिळत आहे.

(Edited by Avinash Chandane)