HomeमहामुंबईरायगडKhopoli News : बेकायदा होर्डिंग्जविरोधात खोपोली नगरपरिषद आक्रमक, थेट कारवाईचा इशारा

Khopoli News : बेकायदा होर्डिंग्जविरोधात खोपोली नगरपरिषद आक्रमक, थेट कारवाईचा इशारा

Subscribe

पनवेल : खोपोली नगरपरिषदेच्या हद्दीत कुणीही बेकायदा होर्डिंग्ज किंवा बॅनर, आकाश चिन्हे तसेच पोस्टर, कमानी लावल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली आहे. त्याचवेळी नगरपरिषदेने जाहिरीतीसांठी अधिकृत जागा निश्चित केल्या असून त्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, नगरपरिषद हद्दीत बेकायदा होर्डिंग लागल्यास कारवाईसलाठी त्याची माहिती नोडल अधिकाऱ्यांना कळवावी, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.

होर्डिंग, बॅनरसाठी निश्चित केलेल्या जागा

  • नगरपरिपद कार्यालय खोपोली बस पार्किंग एरिया
  • जुनी नगरपरिषद कार्यालय खोपोली बाजूला
  • डॉ. बाबासाहेब आंवेडकर चौक
  • नगरपरिषद हॉस्पिटल
  • 4 जंक्शन साई रिव्हर रिसॉर्टजवळ
  • रेस्ट हाऊस जवळ (लखांनी बिल्डर)
  • हायको कॉर्नर (गेटजवळ)
  • पाटणकर चौक
  • राजेश्री शाहू महाराज नाट्यगृह चौक

हेही वाचा…  Alibag News : अखेर बेकायदा होर्डिंग फ्रेम हटवली, अलिबागकरांचा जीव भांड्यात

वर दिलेल्या 9 जागांवरच खोपोली नगरपरिषदेची परवानगी घेऊन जाहिरात होर्डिंग, बॅनर लावावे, अन्यथा कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई करण्यासाठी क्षेत्रिय अधिकारी, भरारी पथक, नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

  1. गौतम मोरे – नोडल अधिकारी तथा स्वछता निरीक्षक (मोबाईल क्र. 9561742828)
  2. शिवा चिन्नास्वामी – भरारी व निष्कासन पथक तथा स्वछता निरीक्षक
  3. सेल्वदुराई शेटू – भरारी व निष्कासन पथक तथा स्वछता निरीक्षक
  4. सचिन घरत – नोडल अधिकारी तथा पोलीस हवालदार (मोबाईल क्र.9423377404)

खोपोली नगरपरिषदेचा टोल-फ्री क्रमांक – 1800-599-2424

(Edited by Avinash Chandane)