Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडMatheran News : STP प्लांटसाठी माथेरानमधील रस्त्याची चाळण, रिक्षा घोड्यांच्या अपघाताला आवताण

Matheran News : STP प्लांटसाठी माथेरानमधील रस्त्याची चाळण, रिक्षा घोड्यांच्या अपघाताला आवताण

Subscribe

माथेरान : हिल स्टेशन माथेरानमध्ये सर्वात जास्त प्रमाणात घोड्यांचे तबेले आणि लोक वस्ती असलेल्या पंचवटी नगरमध्ये जाणाऱ्या मार्गावर काही महिन्यांपूर्वी STP प्लांटसाठी खोदकाम करण्यात आले होते. मल:निसारण पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. मात्र दोन महिने उलटून गेले तरी या ठिकाणाचा रस्ता आजही तशाच स्थितीत ठेवल्यामुळे रहदारीसाठी रस्ता अपुरा पडत आहे. यामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत.

STP प्लांटसाठी खोदलेल्या रस्त्यामुळे रहिवाशांची तसेच अश्वचालकांची मोठी गैरसोय होत आहे. या विभागात एखादा रुग्ण आजारी पडल्यास रस्त्यावरील मोठ्या प्रमाणातील खोदकामामुळे रुग्णवाहिका किंवा ई-रिक्षा देखील येथे येण्यास अडचण होत आहे. तसेच या रस्त्यावर मोठा खड्डा खोदून ठेवल्यामुळे एखाद्या घोड्याचा पाय मोडून मोठा अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा…  Khopoli News : टोलमाफीसाठी भाजप सरसावली, सावरोली टोलनाक्यावरून एक्स्प्रेसवेवर रास्ता रोकोचा इशारा

संपूर्ण रस्त्याची चाळण झाल्याने माथेरान नगरपरिषदेने तातडीने रस्ता सुस्थितीत करावा, अशी मागणी माथेरान करत आहेत.पर्यटन स्थळ असल्यामुळे माथेरानमध्ये पर्यटकांची कायम वर्दळ असते. खराब रस्त्यांमुळे पर्यटकांसोबत एखादी दुर्घटना घडली तर माथेरानचे नाव खराब होऊन त्याचा परिणाम पर्यटनावर होऊ शकतो. त्यामुळे खोदलेले रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.

माथेरान नगरपरिषद या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणार का?

दुर्घटनेपूर्वी रस्ता बनवा

दोन महिन्यापासून आमच्या विभागातील STP प्लांटसाठी रस्ता खोदून ठेवला आहे. या ठिकाणी रुग्णवाहिका किंवा ई-रिक्षा देखील येऊ शकत नाही. रुग्णांना खुर्चीमध्ये बसवून उचलून आणावे लागते. वीज नसल्याने रात्री-अपरात्री मोठ्या खड्ड्यात पडून अपघात होऊ शकतो. याकडे नगरपरिषद प्रशासनाने लक्ष द्यावे.
– दिलीप नाईक, रहिवासी, पंचवटी नगर

(Edited by Avinash Chandane)