HomeमहामुंबईरायगडPanvel News : क्षयरोगमुक्तीसाठी IGPL कडून पनवेल महापालिकेला 4 लाखांची मदत

Panvel News : क्षयरोगमुक्तीसाठी IGPL कडून पनवेल महापालिकेला 4 लाखांची मदत

Subscribe

पनवेल : क्षयरुग्णांवर त्वरीत उपचार करणे, क्षयरुग्णांच्या मृत्यूला आळा घालणे तसेच या रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी पनवेल महापालिकेने 100 दिवसांची क्षयरोग मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला तळोजातील आयजी पेट्रो केमिकल इंडस्ट्रीने सोमवारी (3 फेब्रुवारी) चार लाख रुपयांच्या मदतीचा चेक दिला आहे. आयजीपीएलचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी हा चेक महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे सुपूर्द केला.

भारत देश 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. या रकमेचा उपयोग अधिक जोखमीच्या भागातील लोकांच्या छातीचे क्ष किरण करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. माजी नगरसेवक सतीश पाटील यांच्या सहकार्यातून ही मदत महापालिकेस मिळाली आहे. सामाजिक बांधिलकीच्या (सीएसआर फंड) माध्यमातून महापालिकेस उद्योगांनी मदत करावी, यासाठी 26 डिसेंबर 2024 रोजी तळोजा औद्योगिक संघटना, जवाहर औद्योगिक संघटना, पनवेल औद्योगिक संघटना यांच्यासोबत बैठक घेण्यात आली होती.

हेही वाचा… Panvel Station : पनवेल स्टेशनमध्ये बळी गेल्यावर दुसरा पादचारी पूल बांधणार का, नवीन पनवेलकरांच्या जीवाशी खेळ

दरम्यान, आयजीपीएलकडून चेक स्वीकारताना महापालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, माजी नगरसेवक सतीश पाटील, कुष्ठरोग अधिकारी डॉ. उषा राठोड उपस्थित होते.

(Edited by Avinash Chandane)