Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडPen POP News : पीओपी धोरणाला पेणसह राज्यातील मूर्तिकारांचा विरोध, अधिवेशन काळात मोर्चा काढण्याचा इशारा

Pen POP News : पीओपी धोरणाला पेणसह राज्यातील मूर्तिकारांचा विरोध, अधिवेशन काळात मोर्चा काढण्याचा इशारा

Subscribe

पेण : राज्य सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तीची निर्मिती, विक्री आणि विसर्जनास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी घालली आहे. याला पेणमधील मूर्तिकारांनी तीव्र विरोध केला आहे. या संदर्भात महाराष्ट्र गणेश मूर्तिकार संघटना आणि हमरापूर विभाग गणेश मूर्तिकार उत्कर्ष मंडळाने पेणमधील आगरी समाज हॉलमध्ये जाहीर सभा घेत संघर्षाची भूमिका घेतली आहे. 3 मार्चपासून सुरू होणाऱ्या अधिवेशन काळात मोर्चा काढण्याचाही इशारा दिला आहे. या सभेला मुंबई, ठाण्यासह 22 जिल्ह्यांतील मूर्तिकार आले होते. विशेष म्हणजे महायुती सरकारमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी मूर्तिकारांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा…  Murud News : उपोषण स्थगित तरीही आंदोलनाचा इशारा कायम, जाणून घ्या मुरुडमधील रस्त्याचे प्रकरण

पेणमधून लाखोंच्या संख्येने गणेशमूर्ती निर्माण केल्या जातात. त्यात पीओपीच्या मूर्तींची संख्या मोठी आहे. पेण हे गणपतीचे गाव असल्यामुळे पीओपीवरील बंदीचा मूर्तिकार आणि गणेशमूर्ती कारखानदारांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यातच यंदाचा गणेशोत्सव संपूर्ण पर्यावरणपूरक करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने पावले उचलल्याने मुंबईपाठोपाठ पेणमध्ये राज्यातील गणेशमूर्तीकार एकवटले आहेत.

हेही वाचा…  PM Modi – Sharad Pawar : पंतप्रधानांनी शरद पवारांना खुर्चीवर बसण्यासाठी केली मदत, पाण्याचा ग्लास भरून दिला

मूर्तिकारांना मागणीला पाठिंबा देण्यासाठी भाजप खासदार धैर्यशील पाटील, भाजप आमदार रविंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिकेत तटकरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, शिशिर धारकर आदींनी गणेशमूर्तीकारांच्या लढ्याला शेवटपर्यंत पाठिंबा देणार असल्याचे सभेत जाहीर केले आहे. माघी गणेशोत्सवापासून पीओपी मूर्तींवर निर्बंध लागू केल्याने गणेशमूर्तीकारांच्या रोजगारावर मोठा परिणाम होणार आहे. पीओपीच्या मूर्ती तुलनेने स्वस्त असतात. शाडूच्या मातीचा खर्च जास्त आणि मूर्तीं बनवायला खूप वेळ लागतो, असा मुद्दा पीओपीचे मूर्तिकार मांडत आहेत. दरम्यान, पीओपीला पर्याय देण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने राज्य सरकारला अहवाल सादर करून सक्षम पर्याय द्यावा, अशी भूमिका मूर्तिकारांनी मांडली आहे.

मूर्तिकारांच्या जीवन-मरणाचा प्रश्न

पीओपीचे विघटन करणारा पर्याय शोधणे गरजेचे आहे. हा सामान्य मूर्तीकार आणि कारखान्यातील कामगारांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. – धैर्यशील पाटील, भाजप खासदार

(Edited by Avinash Chandane)