HomeमहामुंबईरायगडMurud News : मुरुडमध्ये बाहेरून येणाऱ्यांची चौकशी करावी, अरविंद गायकर यांनी ही...

Murud News : मुरुडमध्ये बाहेरून येणाऱ्यांची चौकशी करावी, अरविंद गायकर यांनी ही मागणी का केली

Subscribe

मुरुड : पर्यटन क्षेत्र असल्यामुळे मुरुडमध्ये हजारो पर्यटकांची वर्दळ असते. पर्यटकांमुळे सर्व घटकांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे पोटपाण्यासाठी बाहेरून अनेक व्यावसायिक आणि कामगार मुरुडमध्ये येत असतात. त्यांची मुरुड पोलिसांकडून चौकशी करण्यात केली जावी आणि त्यांच्याकडून आधारकार्ड तसेच इतर आवश्यक पुरावे घेतले जावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी पोलिसांकडे केली आहे. स्थानिक आणि पर्यटकांची सुरक्षा यांचा विचार करून आणि कुणीही बाहेरून येऊन कायदा-सुव्यवस्था बिघडवू नये, म्हणून गायकर यांनी ही मागणी केली आहे. सध्या बांगलादेशी घुसखोरांमुळे वातावरण तंग असल्याने ही खबरदारी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा…  Pen News : अंगणवाडीतील खाऊच्या पॅकेटमध्ये चक्क मेलेला उंदीर, अंगणवाडी सेविकेमुळे दुर्घटना टळली

मुरुडमध्ये बाहेरुन आलेले अनेकजण बेकायदा व्यवसाय करत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील फोटोग्राफर, हॉटेलमधील कर्मचारी, कूक, वेटर तसेच काही भाजीपाला, फळविक्रेते परवानगी न घेता व्यवसाय करत आहेत. व्यवसाय करून पोट भरणे हा गुहा नाही. मात्र, संबंधित कुठून आली, त्याचा पत्ता कुठला, ओळख पटणे गरजेचे आहे. ही ओळख पोलिसांनी तपासावी, अशी अपेक्षा गायकर यांनी व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे हॉटेलमालक किंवा ज्यांच्याकडे कामगार आहेत त्यांनी ही माहिती स्वतःहून पोलिसांना देणे बंधनकारक करावे, याकडे गायकर यांनी लक्ष वेधले आहे. अन्यथा गुन्हा घडल्यावर शोध घेण्याची नामुष्की पोलिसावर येईल.

या कामासाठी स्थानिक प्रशासन, नगरपालिका आणि मुरुड पोलिसांनी एकत्र सर्वेक्षण करून सर्वांची नोंद करावी, अशी मागणी अरविंद गायकर यांनी केली आहे.

(Edited by Avinash Chandane)