Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडRaigad News : सुधागड तालुक्यात खैराच्या तस्करीत पुष्पा भाऊ गॅंगची चर्चा, काय आहे वास्तव

Raigad News : सुधागड तालुक्यात खैराच्या तस्करीत पुष्पा भाऊ गॅंगची चर्चा, काय आहे वास्तव

Subscribe

पाली : सुधागड तालुक्यातील जंगलातून मोठ्या प्रमाणात खैराच्या झाडांची तस्करी केली जात असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे ही तस्करी करणारे पुष्पा भाऊ गँग ओळखली जाते. काही महिन्यांपूर्वी झळकलेल्या ‘पुष्पा-2’ या चित्रपटात चंदन तस्करीचा विषय होता. त्यामुळे हा चित्रपट चर्चेत आहे. अशातच खैराच्या लाकडाची तस्करी करणारी टोळी सुधागड तालुक्यात सक्रिय असून त्यांचेही नाव पुष्पाशी साधर्म्य सांगत असल्याने याला निव्वळ योगायोग म्हणाचचे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थानिक लोकांच्या मदतीने खैराच्या झाडांची बेकायदा कत्तल करून तस्करी केली जात असल्याचे समजते. गुटखा बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कात तयार करण्यासाठी खैराच्या झाडांचे लाकूड उपयोगात आणले जाते. ही झाडे जंगल परिसरात सापडतात आणि त्यांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे. मात्र, सुधागड तालुक्यातील जंगल परिसरात खैराच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने रात्रीच्या वेळी येथून मोठ्या प्रमाणात खैराच्या लाकडाची तस्करी केली जाते. ही तस्करी रोखण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अपयश येत असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा…  Matheran News : STP प्लांटसाठी माथेरानमधील रस्त्याची चाळण, रिक्षा घोड्यांच्या अपघाताला आवताण

अलीकडेच खोपोली-पाली मार्गावरून मोठ्या प्रमाणावर जातं-खैर लाकडाची बेकायदा वाहतूक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडली होती. या प्रकरणी एका गुजराती व्यापाराला अटक केली आहे. तसेच गेल्या आठवड्यात मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरच्या वन उपज नाक्यावर १२ लाखांचा खैर जातीच्या लाकडाच्या साठ्याचे दोन ट्रक जप्त करण्यात आले होते. यावरून खैर जातीच्या झाडांची बेकायदा कत्तल आणि तस्करी विरोधात वन विभाग काय उपाययोजना करणार याकडे सुधागड तालुक्याचे लक्ष लागले आहे. वेळीच उपाययोजना केली नाही तर पर्यावरणीय संकट निर्माण होणार आहे. याला जबाबदार कोण?

(Edited by Avinash Chandane)