HomeमहामुंबईरायगडSudhagad News : 7 वर्षांत 22 शाळा बंद, सुधागड तालुक्यात असं काय...

Sudhagad News : 7 वर्षांत 22 शाळा बंद, सुधागड तालुक्यात असं काय घडतंय

Subscribe

पनवेल : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात अनेक प्राथमिक शाळा बंद पडत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. अनेक उपाययोजना करूनही शाळा बंद होत असल्याने यामागील कारणांचाही शोध गटशिक्षणाधिकारी घेत आहेत. मात्र, वाढत्या खासगी शाळा आणि गावांमध्ये रोजगार उपलब्ध नसल्याने पालक शहरात येत असल्याने मुलांनाही शहरातील शाळांमध्ये प्रवेश घेतला जात आहे, हे एक कारण समोर आले आहे.

2017 ते 2024 या सात वर्षांच्या कालावधीत सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या तब्बल 22 प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. विशेष म्हणजे 2017 पूर्वी सुधागड तालुक्यात 181 प्राथमिक शाळा होत्या. आता त्यांची संख्या 159 इतकी खाली आली आहे. ही बाब गंभीर आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाणारे बहुतांश विद्यार्थी गरीब घरातील असतात.

हेही वाचा…  Snehal Jagtap : भाजपच्या वाटेवर अशी चर्चा का, स्नेहल जगताप काय म्हणाल्या

सुधागड तालुक्यांतील अनेक गावांमध्ये रोजगाराच्या संधी नाहीत. त्यामुळे पालक कामधंद्यानिमित्त शहरात किंवा पनवेल, खोपोली, ठाणे, पुणे, वसईमध्ये जात आहेत. अशी ठिकाणी जाताना कुटुंबाला घेऊन जातात. या मुलांना पालक नंतर नोकरी-धंद्याच्या गावी खासगी शाळेत प्रवेश घेतात. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते. हे चक्र अनेक वर्षे सुरू असल्याने सात वर्षांत 22 प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत असते. तसेच गणेश, पुस्तके विनामूल्य दिले जातात. शिवाय मध्यान भोजनची सुविधा असतानाही विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये येत नाहीत, यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची चिंता वाढली आहे.

(Edited by Avinash Chandane)