अलिबाग : जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचा बोऱ्या वाजलेला असतानाच आता रायगड जिल्हा परिषदेने संभाव्य पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी 5 कोटी 62 लाख 68 हजार रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. हा आराखडा मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे. या आराखड्यात 1 हजार 16 गावे आणि वाड्यांवरील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
रायगडमधील अनेक गावांना मार्चअखेरपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. म्हणूनच जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. या आराखड्यानुसार विहिरींची खोली वाढवणे, त्यातील गाळ काढणे, टंचाईग्रस्त गावांना टँकर आणि बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, नवीन विंधन विहीर खोदणे, विंधन विहीरींची दुरुस्ती करणे या उपाययोजना प्रस्तावित आहेत.
हेही वाचा… Water Shortage : रायगडवासीयांच्या डोक्यावर यंदाही पाण्याचा हंडा, डेडलाईन संपूनही 931 योजना अपूर्ण
आराखड्यावर नजर
विहिरी खोल करणे गाळ काढणे : खर्च 60 लाख 18 हजार
टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा : खर्च 3 कोटी 52 लाख 92 हजार
नवीन विंधन विहिरी : खर्च 1 कोटी 3 लाख 68 हजार
विंधन विहिरींची दुरुस्ती : खर्च 45 लाख 90 हजार
हेही वाचा… Raigad : शंभूराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमला, 345 व्या राज्याभिषेक दिनाचा जल्लोष
जलवाहिनी फुटलेली दिसली तर कळवा
पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याचा वापर जपून करावा, पाणी स्त्रोत दूषित होणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच जलवाहिनी फुटली तर लगेच निदर्शनास आणून द्यावी.
– डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड
(Edited by Avinash Chandane)